Thursday, September 11, 2025 06:41:08 PM

ISIS Terrorist Arrest: ISIS शी संबंधित 5 दहशतवाद्यांना अटक; बॉम्बस्फोटाचा कट उधळला

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी एकत्रित कारवाईत दिल्ली, मुंबई आणि झारखंड येथे छापे टाकून 5 ISIS दहशतवाद्यांना अटक केली आहे.

isis terrorist arrest isis शी संबंधित 5 दहशतवाद्यांना अटक बॉम्बस्फोटाचा कट उधळला

ISIS Terrorist Arrest: दिवाळीपूर्वी सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी एकत्रित कारवाईत दिल्ली, मुंबई आणि झारखंड येथे छापे टाकून 5 ISIS दहशतवाद्यांना अटक केली आहे. ही कारवाई मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाची शक्यता टाळण्यासाठी करण्यात आली.

दिल्लीतून अटक केलेल्या दहशतवाद्यांची ओळख आफताब आणि सुफियान अशी झाली आहे, जे मुंबईचे रहिवासी आहेत. स्पेशल सेलने मुंबईतील त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवरही छापे टाकले, जिथून शस्त्रे आणि आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. झारखंडमधील रांची येथून अशर उर्फ दानिश याला अटक करण्यात आली असून, त्याच्या लपण्याच्या ठिकाणावरून रासायनिक आयईडी बनवण्याचे साहित्य मिळाले. प्राथमिक तपासात असे दिसून आले की हे दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या कटात सहभागी होते.

हेह वाचा - Solapur Crime Pooja Gaikwad: डान्सरच्या नादात उपसरपंचाने स्वत:वर गोळी झाडली, 21 वर्षीय नर्तिकेवर गुन्हा दाखल

दिल्ली पोलिसांना 9 सप्टेंबर रोजी एका खबऱ्याकडून आफताबचा सुगावा मिळाला. या माहितीच्या आधारावर स्पेशल सेलने आफताबला अटक केली, ज्याच्या चौकशीत दानिशचा शोध लागला. त्यानंतर गुप्तचर यंत्रणा आणि झारखंड एटीएसने रांचीमध्ये इस्लाम नगरमधील एका लॉजवर छापा टाकला, जिथे दानिश विद्यार्थी म्हणून राहत होता. चौकशीत समोर आले की तो रासायनिक शस्त्रे बनवण्यात तज्ज्ञ आहे.

जप्त केलेले साहित्य

दहशतवाद्यांकडून पिस्तूल, डिजिटल उपकरणे, हायड्रोक्लोरिक अॅसिड, नायट्रिक अॅसिड, सोडियम बायकार्बोनेट, सल्फर पावडर, पीएच व्हॅल्यू चेकर, वजन यंत्र, बीकर सेट, सेफ्टी ग्लोव्हज, रेस्पिरेटरी मास्क, लॅपटॉप, मोबाईल फोन, स्ट्रिप वायर, सर्किट, मदरबोर्ड, डायोड जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा - Pune Crime : मोठ्या आवाजात पत्नीला हॉरर सिनेमाची कथा सांगणे पतीला पडले महागात! चित्रपटगृहात मारहाण; जाणून घ्या

सध्या गुप्तचर यंत्रणा पाचही आरोपींना चौकशी करत आहे. सध्या गुप्तचर यंत्रणा आरोपींकडून त्यांनी कोणत्या हल्ल्याचा कट रचला होता, बॉम्ब कुठे ठेवायचा होता, इतर साथीदार कोठे आहेत आणि हल्ल्याचे नियोजन कुठे होत होते? तसेच, हे सर्व कोणाच्या आदेशानुसार केले जात होते? याचा शोध घेत आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री