Thursday, September 11, 2025 08:55:38 PM

Beed: धक्कादायक! घशात चॉकलेट अडकून सात महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

बीडमधून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. घशात चॉकलेट अडकून सात महिन्यांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

beed धक्कादायक घशात चॉकलेट अडकून सात महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

बीड: आपण लहान मुलांच्या अनेक घटना पाहत असतो. मात्र आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका सात महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. 

बीडमधून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. घशात चॉकलेट अडकून सात महिन्यांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आरोही खोड असं या चिमुरडीचा नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा: Malad Crime: '...तर माझ्या भावाचा जीव वाचला असता', रेस्टॉरंटमधील जेवणावरून कल्पेश भानुशालीनं गमावला जीव; एकाला अटक, चार फरार

चॉकलेट घशात कसं गेलं? 
मुलीच्या घशात चॉकलेट अडकल्यानंतर या चिमुकलीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, उपचारापूर्वीच चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घरातच खेळत असताना खाली पडलेले चॉकलेट तिने तोंडात टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चॉकलेट तिच्या घशात अडकले आणि तिचा यात दुर्दैवी अंत झाला. 

 


सम्बन्धित सामग्री