Wednesday, August 20, 2025 12:57:09 PM

रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल; कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल कारण काय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट करणं त्यांना भोवलं आहे. त्यांच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची करण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल केल्याप्रकरणी आव्हाड यांनी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रूपाली ठोंबरेंसह, विक्रांत फड, रेखा फड, कष्णा धानोरकर, बिबीशन आघाव, आकाश चौरे, सौरभ आघाव यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी रितसर तक्रार केली आहे. याची एक्स या समाज माध्यमावर आव्हाड यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा : धनंजय मुंडे विरोधातील आव्हाडांची चॅट व्हायरल; नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे भाष्य केले आहे. बीडमधील केलेल्या खोट्या एफआयआरला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पोस्टद्वारे काय म्हणाल्या रूपाली ठोंबरे?

येस भेटू या बीडमधील खोट्या एफआयआरच्या तपासात माझे 100 टक्के सहकार्य असणार आहे. खोट्या एफआयआर केल्याबद्दल धन्यवाद जितेंद्र भाऊ आव्हाड. आता होईल दूध का दूध और पानी का पानी. आता विरोधकांनी विनाकारण ओरडू नये सरकार तक्रार घेत नाही, दबाव आणतात म्हणून तुमची खोटी तक्रार घेतली बर का? महायुतीचे सरकार लोकशाही, कायद्याने चालवणारे सरकार आहे यावर शिक्कामोर्तब झाले. खोट्या एफआयआरच्या लढाईसाठी मी तयार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

'चॅटची चौकशी करा, त्यांचा खरा चेहरा समोर येईल'

संतोष देशमुख हत्‍येप्रकरणी जितेंद्र आव्‍हाड यांचे चॅट रूपाली ठोंबरे यांनी सोशल मिडियावर व्‍हायरल केलं आहे. यामध्‍ये जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या भूमिकेवर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष सुनील तटकरे यांनी शंका व्‍यक्‍त केली आहे. याची सखोल चौकशी सायबर सेलमार्फत व्‍हावी अशी मागणी तटकरे यांनी केली आहे. जे चॅट प्रसिदध झालं आहे. त्‍यात या घटनेमागचं गांभीर्य आहे की त्‍यांना आणखी काही साधायचं आहे हे समजेल त्‍यांचा चेहरा समोर येईल असं सुनील तटकरे यांनी म्‍हटलं आहे.

 


सम्बन्धित सामग्री