Sunday, August 31, 2025 08:13:12 AM

अकोल्यात शिक्षकाने केले घृणास्पद कृत्य

अकोला जिल्ह्यातील काजीखेडच्या जिल्हा परिषद शाळेत झालेल्या घृणास्पद प्रकारामुळे जनमानस चांगलंच संतप्त झालं आहे.

अकोल्यात शिक्षकाने केले घृणास्पद कृत्य

अकोला : अकोला जिल्ह्यातील काजीखेडच्या जिल्हा परिषद शाळेत झालेल्या घृणास्पद प्रकारामुळे जनमानस चांगलंच संतप्त झालं आहे. शाळेतील शिक्षक प्रमोद सरदार याने आठवीतल्या सहा विद्यार्थीनींचा विनय भंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेविरोधात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राशप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान प्रकरणातील आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे तसेच त्याला जिल्हा परिषदेने शिक्षक पदावरुनही बडतर्फ केले आहे. 

 


सम्बन्धित सामग्री