Monday, September 01, 2025 02:45:48 AM

दादांना विमानात का बांधली राखी ?

उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत पक्ष आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना प्रोत्साहित करत आहेत.

दादांना विमानात का बांधली राखी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत पक्ष आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना प्रोत्साहित करत आहेत. नागपुर येथे अजित पवारांनी काही महिला कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रवास केला. पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुंबईत आलेल्या महिलांची ट्रेन चुकली होती आणि त्यानंतर दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी त्यांना आपल्यासोबत प्रवास करण्याची विनंती केली. दादांना भेटल्यानंतर आणि त्यांच्यासोबत प्रवास केल्यानंतर त्यांचा आनंद आणि उत्साह गगनात मावेनासा झाला होता. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजित पवार आणि विशेषत: त्यांच्या महिला सक्षमीकरणासाठीच्या उपक्रमांचं कौतुक केलं.  

 

 

 

या व्हिडिओमध्ये महिला 'एकच वादा, अजितदादा' असे नारे लावताना दिसत आहेत.


सम्बन्धित सामग्री