राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी चर्चेत असलेले पाहायला मिळतात. अनेकदा अजित पवार हे त्यांच्या वक्तव्यामुळे हशादेखील पिकतो. अशातच आता एका कृतीमुळे अजित पवार चर्चेत आले आहेत. वर्धा येथे एका कार्यक्रमास्थळी दाखल होत असताना कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र पुष्पगुच्छ प्लास्टीकच्या पिशवीमध्ये आणल्याने अजित पवारांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना लाजा वाटत नाहीत का? अशा भाषेत सुनावले.