२३ सप्टेंबर, २०२४ , बदलापूर : बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. प[ओलिसांकडून आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला आहे. आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावत पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात ओपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. तळोजा कारागृहातून बदलापूर येथे नेत असताना, पोलिसांची बंदूक हिसकावत त्याने गोळीबार सुरु केला. यात पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेत अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला होता तसेच त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे.