Thursday, September 18, 2025 05:32:22 PM

EC Dismisses Rahul Gandhi's Allegations: 'सर्व आरोप चुकीचे आणि निराधार...'; राहुल गांधींनी लावलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले

निवडणूक आयोगाने आता राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिले असून ते पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

ec dismisses rahul gandhis allegations सर्व आरोप चुकीचे आणि निराधार राहुल गांधींनी लावलेले आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले

EC Dismisses Rahul Gandhi's Allegations: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. गुरुवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी दावा केला की कर्नाटकात मतदार यादीतून त्यांच्या पक्षाचे समर्थन करणाऱ्या मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील अलांड विधानसभा मतदारसंघातील आकडेवारीचा हवाला देत राहुल गांधी यांनी हा दावा केला. तथापी, निवडणूक आयोगाने आता राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिले असून ते पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना स्पष्ट केले की, 'हे आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. कोणताही सामान्य नागरिक ऑनलाइन मत हटवू शकत नाही, तसेच प्रभावित व्यक्तीस आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय मते हटवली जाऊ शकत नाहीत. 2023 मध्ये अलांड विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे हटवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते. मात्र, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतः एफआयआर दाखल केला होता.'

हेही वाचा - Rahul Gandhi On EC: 'निवडणूक आयोग झोपलेला नाही, तो...'; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

राहुल गांधी यांनी अलांड विधानसभा मतदारसंघातील आकडेवारीचा हवाला देत सांगितले की येथे 6,018 मतदारांची नावे हटविण्याचा प्रयत्न झाला, तर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात 6,850 नावे जोडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तथापी, राहुल गांधींचा आरोप आहे की या प्रक्रियेत संबंधित मतदारांना कोणतीही माहिती नव्हती. तसेच, कर्नाटक सीआयडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यांनी 18 पत्रे पाठवून विशिष्ट माहिती मागितली होती, पण ती माहिती पुरवली गेली नाही. राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर लोकशाहीचा नाश करणाऱ्या आणि मते चोरणाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला.

हेही वाचा - Avinash Jadhav On Meenatai Thackeray Statue: '24 तासात कारवाई झाली नाही तर...'; अविनाश जाधवांचा इशारा

दरम्यान, आलंडचे आमदार बीआर पाटील यांनी इंडिया टीव्हीशी बोलताना सांगितले की, 'जर मी हटवलेल्या मतदारांवर लक्ष ठेवले नसते, तर निवडणूक हरवली असती. मी तक्रार दाखल केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही.' राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत या प्रकरणावर प्रकाश टाकत बीआर पाटील यांना मंचावर आणले आणि मुद्दे मांडले. या प्रकरणामुळे देशातील मतदार यादीतील पारदर्शकता आणि निवडणूक प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.


सम्बन्धित सामग्री