Thursday, September 18, 2025 06:52:33 PM

Gold Rate : सोन्याच्या किंमतीत वाढ… शेअर बाजारावर संकटाचे ढग?

शेअर बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो का, याबाबत चर्चा रंगत आहे. इतिहासाकडे पाहिल्यास, सोन्याच्या किंमती वाढल्यावर अनेकदा शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे.

gold rate  सोन्याच्या किंमतीत वाढ… शेअर बाजारावर संकटाचे ढग

मागील काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली असून, शेअर बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो का, याबाबत चर्चा रंगत आहे. इतिहासाकडे पाहिल्यास, सोन्याच्या किंमती वाढल्यावर अनेकदा शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे.

काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही परिस्थिती 1971 मधील ‘निक्सन शॉक’ची आठवण करून देते. त्या काळात सोन्याचे दर अनेक वर्षे स्थिर होते, परंतु अचानक मुक्त झाले आणि दोन दशकांपर्यंत त्यात प्रचंड वाढ झाली. महागाई आणि जागतिक अस्थिरता या दोन्ही घटकांनी त्या काळात मोठा प्रभाव टाकला होता.

हेही वाचा - Monorail Temporarily Suspended: MMRDA चा मोठा निर्णय! मुंबई मोनोरेल सेवा 20 सप्टेंबरपासून तात्पुरती स्थगित 

आता पुन्हा सोन्याच्या सतत वाढत्या किंमतींमुळे अशाच प्रकारची भीषण परिस्थिती निर्माण होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तरीदेखील, गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळाला आहे.आयसीआयसीआय सिक्युरिटीजने स्पष्ट केले आहे की सोन्याच्या वाढत्या किंमती आणि शेअर बाजारातील चढ-उतार यांचा थेट संबंध नाही. त्यांचे म्हणणे आहे की सध्याची वाढ ही केवळ एक योगायोग असू शकते. सोनं आणि इक्विटी एकत्र वाढण्याची उदाहरणे पूर्वी अनेकदा दिसली आहेत.

हेही वाचा - Buldhana Accident : बुलढाण्यात कार-ट्रेलरची भीषण धडक; चौघांचा जागीच मृत्यू, पाच जखमी 

विशेष म्हणजे, 2008-09 च्या जागतिक आर्थिक संकटानंतर 2010 मध्ये शेअर बाजार वेगाने वर गेला आणि त्याच वेळी सोन्याचे भावही वाढत राहिले. 1980 च्या दशकातही सोनं आणि शेअर बाजार एकाच वेळी उच्चांकावर पोहोचले होते. त्यामुळे सोन्याच्या दरांचा वापर बाजारातील हालचालींचे अचूक भाकीत करण्यासाठी करणे योग्य ठरणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.


सम्बन्धित सामग्री