नवी दिल्ली : ॲपलने 9 सप्टेंबर रोजी नवीन iPhone 17 सिरीज आणि कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात Slim स्मार्टफोन iPhone Air जाहीर केला. यंदाच्या लाईनअपमध्ये iPhone 17, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max ही तीन मॉडेल्स तसेच iPhone Air हा खास पर्याय उपलब्ध आहे. “Plus” मॉडेल बंद करून ॲपलने बाजारात नवीन बदल आणला आहे.
नव्या iPhone 17 मध्ये आता 120Hz ProMotion LTPO डिस्प्ले, 3,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि Always-on Display आहे. याशिवाय 48MP अल्ट्रावाईड कॅमेरा देण्यात आला आहे. जो आधी फक्त प्रीमियम अँड्रॉइड डिव्हाइसवर मिळत होता. Pro मॉडेल्समध्ये नवीन आयताकृती कॅमेरा आयलंड, 48MP टेलीफोटो सेन्सर आणि शक्तिशाली A19 Pro चिपसह व्हेपोर चेंबर दिले गेले आहे. ज्यामुळे हे डिव्हाइस जास्त वापरादरम्यानही थंड राहतात.
हेही वाचा : India’s Data Centre : 'डेटा ट्रॅफिक वाढीमुळे भारतातील डेटा सेंटर उद्योगाला गती'; जेफरीज कंपनीनं केलं स्पष्ट
iPhone Air हा सर्वात Slim (5.6mm) आणि हलका (165 ग्रॅम) iPhone आहे. यात 6.5-इंच Super Retina XDR डिस्प्ले आहे. तथापि, या डिझाईनसाठी ॲपलला बॅटरी आणि कॅमेरा क्षमतेत तडजोड करावी लागली आहे. Air मॉडेलमध्ये फक्त एक 48MP कॅमेरा सेन्सर आणि A19 Pro चिप असून व्हेपोर चेंबर नाही. त्यामुळे हेवी वापरात तो जास्त तापू शकतो. iOS 26 हा ॲपलचा नवा ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट आहे, जो “Liquid Glass” डिझाईन लुकसह आला आहे. या अपडेटमुळे UI घटक अधिक पारदर्शक दिसतात. मात्र Apple Intelligence फीचर्स फक्त iPhone 15 Pro, iPhone 16 आणि iPhone 17 सिरीजसह iPhone Air वर उपलब्ध असतील.
बॅटरीबाबत ॲपलने नेहमीप्रमाणे क्षमता न सांगता व्हिडिओ प्लेबॅक टाइम जाहीर केला आहे. iPhone 17 मध्ये 30 तास, iPhone 17 Pro मध्ये 31 तास, iPhone 17 Pro Max मध्ये 37 तास आणि iPhone Air मध्ये 27 तासांचा बॅकअप मिळतो. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास भारतात iPhone 17 ची सुरुवात 82,900 हजारापासून होते. तर iPhone 17 Pro 1,34,900 हजार, Pro Max 1,49,900 हजार आणि iPhone Air 1,19,900 हजाराला मिळतो. हे सर्व डिव्हाइस 19 सप्टेंबरपासून विक्रीस उपलब्ध होणार आहेत. तसेच प्री-ऑर्डर्स आधीच सुरू झाल्या आहेत.