Monday, September 01, 2025 10:42:19 AM

'बदलापूर'च्या आरोपीला पोलीस कोठडी

शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली.

बदलापूरच्या आरोपीला पोलीस कोठडी

बदलापूर : शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली. बदलापूर प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. आरोपीने अजून काही लैंगिक शोषण आणि कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी केली.

बदलापूर आंदोलन प्रकरणी ३०० जणांविरोधात गुन्हा नोंदवला

बदलापूरमधील विद्यार्थिनींवर आत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी रेल रोको केला होता. यादरम्यान पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी ३० संशयिताना ताब्यात घेतलं होतं. त्यात १२ महिलांचा समावेश होता. त्या महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आलं. मात्र १८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एकंदरीत ३०० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.


सम्बन्धित सामग्री