बीड: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने आलेल्या कंटेनरने सहा जणांनी चिरडले आहे. हा भीषण अपघात बीड जिल्ह्यातील नामलगाव फाट्याजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. हे सर्व लोक देवदर्शनासाठी पायी चालले होते. अशावेळी त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. बीड ग्रामीणच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच जखमी झालेल्या व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, आज सकाळी नामलगाव फाट्याजवळ बीड-धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने रस्त्यावर पायी चालणाऱ्या सहा जणांना चिरडले. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर झाले असून त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे.
हेही वाचा: Arun Gawli : शिवसेना नगरसेवक हत्येप्रकरणी अरुण गवळीला दिलासा; तब्बल 18 वर्षांनंतर जामीन मंजूर
अपघात झालेली लोक बीड जिल्ह्यातील पेंडगाव येथे दर्शनासाठी चालेले होते. यावेळी त्यांचा अपघात झाला. काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपुलाजवळही असाच अपघात झाला होता. त्यात कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. सतत घडणाऱ्या अपघाताच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
विशाल काकडे, अमोल गरजे, आकाश कोळसे, पवन जगताप, किशोर तोर अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. दरम्यान अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील अधिकचा तपास पोलीस करत आहेत.