Friday, August 29, 2025 12:42:56 PM

Google Search: गुगलवर 'या' गोष्टी सर्च करताय, तुमच्यावर कारवाई होऊ शकते...

गुगलवर सर्व गोष्टी सर्च करणे सुरक्षित नसते. काही कीवर्ड किंवा विषय सर्च केल्यास तुम्ही थेट काही कायदेशीर अडचणींमध्ये सापडू शकता आणि पोलीस तुमच्या दारातही पोहोचू शकतात, जाणून घ्या..

google search गुगलवर या गोष्टी सर्च करताय तुमच्यावर कारवाई होऊ शकते

Google Safe Internet Search: डिजिटल युगात गुगल हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. शिक्षण , नोकरी, खरेदी, बिझनेस, क्रिकेट, मनोरंजन यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे लोक गुगलवर शोधतात. मात्र गुगलवर सर्व गोष्टी सर्च करणे सुरक्षित नसते. काही कीवर्ड किंवा विषय सर्च केल्यास तुम्ही थेट काही कायदेशीर अडचणींमध्ये सापडू शकता आणि पोलीस तुमच्या दारातही पोहोचू शकतात.  

गुगल सर्च हिस्ट्रीकडे नजर ठेवा (Google Search History)

गुगल तुमच्या प्रत्येक सर्च क्वेरीचा डेटा जतन करुन ठेवते. गरज पडल्यास सायबर सेल आणि तपास यंत्रणा हा डेटा तपासू शकतात. यामुळे जर तुम्ही चुकीचा किंवा संशयास्पद शब्द सर्च केला, तर तो तुमच्याविरुद्ध पुरावा ठरु शकतो. आयटी, सायबर कायद्यान्वये अशा प्रकरणी कारवाई होऊ शकते. 

हेही वाचा: Smartphone Security: तुमच्या फोनवर हॅकर्सची नजर! हॅकिंगपासून बचावासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
काय सर्च करणे टाळावे? 
हत्यारे किंवा बॉम्ब तयार करण्याचे मार्ग सर्च करणे, हा एक गंभीर गुन्हा आहे. 
ड्रग्सच्या संबंधित माहिती सर्च करणे. त्यामुळे कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. 
बाल अश्लील साहित्य किंवा प्रतिबंधित कंटेंट- शिक्षा आणि दंड होऊ शकतो. 
कोणताही धर्म, व्यक्ती, किंवा संस्थेविरोधात सर्च करणे, सायबर क्राईममध्ये येते. 
बँकिंग फ्रॉड, बनावट नोटा किंवा हॅकिंग ट्रिक्स सर्च करणे यामुळे त्वरित पोलीस तुमच्यावर कारवाई करु शकतात. 

पोलीस कारवाई होऊ शकते? 
अनेकवेळा फक्त उत्साह किंवा कुतूहलातून सर्च केल्यानंतरसुद्धा लोकांवना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची उदाहरणे आहेत. अशा विषयांवर गुगल आणि सोशल मीडिया अशा दोन्ही ठिकाणी तुमची हिस्ट्री सर्च तपासली जाते. या माहितीच्या आधारे पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. 

गुगल हा तुमचा मित्र आहे. परंतु कायद्यापेक्षा मोठा नाही हे लक्षात असु द्या. सामान्य ज्ञान, माहिती, शिक्षण, मनोरंजन आणि ज्ञानासाठी गुगलचा वापर करा. चुकीच्या सर्चमुळे तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता.  

 


सम्बन्धित सामग्री