Sunday, August 31, 2025 06:31:39 AM

Manoj Jarange Patil Protest : '70 वर्ष वाटोळे झाले हे एकाही मराठ्याने विसरू नये...', आझाद मैदानात जरांगेंचा एल्गार, केली उपोषणाची घोषणा

आझाद मैदानावर आंदोलकांनी मोठी तूफान गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकासोबत बोलताना दिसले.

manoj jarange patil protest  70 वर्ष वाटोळे झाले हे एकाही मराठ्याने विसरू नये आझाद मैदानात जरांगेंचा एल्गार केली उपोषणाची घोषणा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर पोहोचले  या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक संपूर्ण तयारीनीशी मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल झाले असून त्यांचे मंचावर आगमन झाले आहे. आझाद मैदानावर आंदोलकांनी मोठी तूफान गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकासोबत बोलताना दिसले. 

यावेळी ते म्हणाले की, सरकारने परवानगी दिली त्यामुळे त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आंदोलनकर्त्यांना  पोलिसांना सहकार्य करा, गाड्या सांगतील तिथे पार्क करा, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच सरकारला आपल्याला सहकार्य करायचे नव्हते म्हणून मुंबईला यावे लागले असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Maratha Protest: सदावर्तेंचा वेल्डिंगचा चष्मा फोडू, मराठा आंदोलकांचा सदावर्तेंवर जोरदार हल्लाबोल

त्याचप्रमाणे गडबड गोंधळ करू नका, लोकांचे ऐका आपल्या समाजाचे 70 वर्ष वाटोळे झाले हे एकाही मराठ्याने विसरू नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.  मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे ही आपली जबाबदारी आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Manoj Jarange Protest: जरांगेंच्या आंदोलनाला कोणत्या नऊ लोकप्रतिनिधींचा पाठिंबा?, आंदोलनासाठीच्या नेमक्या अटी काय? 

मुंबई उच्च न्यायालयाने सुरुवातील मनोज जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती मात्र त्यानंतर न्यायालयाने परवानगी दिली. परंतु काही अटी आणि शर्ती लावण्यात आल्या आहेत. फक्त 5 हजार आंदोलकांनाच आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री