Sunday, August 31, 2025 06:04:35 AM

Manoj Jarange : 'जेवण-चहाची दुकानं बंद, शौचालयाला कुलूप, तुम्ही तर इंग्रजांपेक्षा बेक्कार'; मनोज जरांगेंचा सरकारवर घणाघात

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज मराठ्यांच आंदोलन धडकलंय.

manoj jarange  जेवण-चहाची दुकानं बंद शौचालयाला कुलूप तुम्ही तर इंग्रजांपेक्षा बेक्कार मनोज जरांगेंचा सरकारवर घणाघात

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईत आज मराठ्यांच आंदोलन धडकलंय. आंदोलनाला आणखी एक दिवसाची परवानगी मिळाल्यानंतर आज दिवसाअखेरीस मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टिका केली. हे सरकार तर इंग्रजांपेक्षाही बेक्कार असल्याचा घणाघात जरांगे यांनी केला. 

हेही वाचा : Sadawarte Vs Manoj Jarange : मराठा आंदोलकांकडून सदावर्तेंना धमकीचा फोन; सदावर्तेंचा पलटवार

जरांगेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - 

आझाद मैदानावर आलेली आंदोलक वैतागून निघून जावीत यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सरकारने बंद केली, शौचालये बंद केली, चहा आणि नाष्टाची दुकाने तसेच जेवणाची हॉटेल बंद ठेवली.

सरकारने काय केलं ते मला माहीत नाही. त्यांनी काल परवानगी दिली, आज दिली, आणखी आता उद्याची दिली. माझं म्हणणं आहे, हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा सरकारने असली डाव खेळावा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं. 

सरकारला आता अशी योग्य संधी आहे, गोरगरिबांची मनं जिंकण्याची योग्य वेळ आहे. सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठे विसरणार नाहीत, जर त्यांनी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण दिलं. माझा मरेपर्यंत गरीब मराठा विसरणार नाही.

तुम्ही एक-एक दिवस परवानगी दिली तरी मागण्या मिळेपर्यंत उपोषण होणार आहे. तुम्ही कायमस्वरुपी दिली तरी हे उपोषण मागण्यांची अंमलबजावणी होईस्तोर होणार आहे. ही नाटकं का खेळायची? सिद्ध झालं की, परवानगी देणं सरकारच्या हातात आहे.

हे आंदोलन मोडायचं की परवानगी द्यायची की मला गोळ्या झाडून मारायचं हे सरकारच्याच हातात आहे. पोरं रस्त्याला आडवायचे हे सरकारच्या हातात आहे. तुम्ही त्यांना त्रास दिला नाही, तर पोरंसुद्धा काही करत नाहीत.

सरकारने शौचालयाचे कुलुप लावून दारं बंद केली, पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की, चहाचे, नाष्टाचे आणि जेवणाचे दुकानंदेखील बंद केले. त्यामुळे आंदोलक हे सीएसटीला बसले होते. जेवायला मिळू नये, चहापाणी मिळू नये आणि मराठ्यांनी वैतागून निघून जावं, असे प्रयत्न आहेत. तुम्ही तर इंग्रजांपेक्षा बेक्कार झाले.


सम्बन्धित सामग्री