Sunday, August 31, 2025 11:26:50 AM

Manoj Jarange Patil Maratha Protest : 2023 ते 2025, जालना ते आझाद मैदान; जरांगे पाटलांच्या आंदोलनाची संपूर्ण Chronology वाचा

मनोज जरांगे पाटील यांनी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदान परिसरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. परंतु मनोज जरांगे पाटलांनी किती वेळा उपोषण केलं आहे. हे तुम्हाला माहिती आहे का, जाणून घ्या..

manoj jarange patil maratha protest  2023 ते 2025 जालना ते आझाद मैदान जरांगे पाटलांच्या आंदोलनाची संपूर्ण chronology वाचा

मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदान परिसरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन छेडले आहे. सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार असा इशाराही जरांगेंनी दिला आहे. मराठा म्हटलं की जरांगे नाम ही काफी है अशी भावना सगळ्यांच्या मनामध्ये येते. अर्थात त्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच लोकांना जरांगे पाटील माहिती झाले. परंतु मनोज जरांगे पाटलांनी किती वेळा उपोषण केलं आहे. हे तुम्हाला माहिती आहे का, जाणून घ्या.. 

मनोज जरांगे पाटील गेल्या तीन वर्षापासून उपोषण करत आहेत. जरांगेंनी  29 ऑगस्टला पहिले उपोषण केले. ते उपोषण 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 अशा 17 दिवस चालले. दुसरे उपोषण त्यांनी 25 ऑक्टोबर 2023 रोजी केले. ते 9 दिवस चालले.  म्हणजेच 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत झाले. 

हेही वाचा: Manoj Jarange Patil: सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही; आझाद मैदानावरुन जरांगेंचा सरकारला इशारा

यानंतर त्यांनी तिसरे उपोषण मुंबईला करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे ते मराठ्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. वाशीपर्यंत आल्यानंतर सरकारने जरांगेंसोबत चर्चा करुन नवी मुंबईत उपोषण करण्याबाबत सांगितले. हे उपोषण 26 ते 27 जानेवारी 2024 अशा दोन दिवस झाले. 

यापुढची सगळी उपोषणे त्यांनी अंतरवाली सराटीतच केली. मात्र हे पहिले उपोषण आहे, जे मुंबईत सुरु आहे. लाखोंच्या संख्येने मराठा कार्यकर्ते आंदोलनाला उपस्थित राहिले आहेत. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

हेही वाचा: Sanjay Raut: जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जातंय; राऊतांचा महायुतीला टोला

जरांगेंची गेल्या 3 वर्षातील उपोषणं

पहिलं उपोषण
कालावधी : 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023
ठिकाण : अंतरवाली सराटी

दुसरं उपोषण
कालावधी : 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023
ठिकाण : अंतरवाली सराटी

तिसरं उपोषण
कालावधी : 26 ते 27 जानेवारी 2024
ठिकाण : नवी मुंबई

चौथं उपोषण
कालावधी : 10 ते 26 फेब्रुवारी 2024
ठिकाण : अंतरवाली सराटी

पाचवं उपोषण
कालावधी : 4 ते 10 जून 2024
ठिकाण : अंतरवाली सराटी

सहावं उपोषण
कालावधी : 20 ते 24 जुलै 2024
ठिकाण : अंतरवाली सराटी

सातवं उपोषण
कालावधी : 25 ते 30 जानेवारी 2025
ठिकाण : अंतरवाली सराटी

आठवं उपोषण
दिनांक : 29 ऑगस्ट 2025
ठिकाण : आझाद मैदान, मुंबई


सम्बन्धित सामग्री