Sunday, August 31, 2025 06:10:29 AM

Eknath Shinde : मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'मी मुख्यमंत्री असताना...'

मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा धडकला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील आंदोलक एकवटले आहेत.

eknath shinde   मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य म्हणाले मी मुख्यमंत्री असताना

मुंबई : मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा धडकला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील आंदोलक एकवटले आहेत. दरम्यान, आंदोलनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपले मत मांडले आहे. मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण आजही टिकून आहे. यापुढेही ते टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरुन राजकारण करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना दिले. तसेच ते पुढे म्हणाले की, विरोधकांनी केवळ मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला. सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मराठा आरक्षण कुणाचंही कमी करुन देणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.  

हेही वाचा : Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी केली देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका; म्हणाले, 'गरज असेल तेव्हा...'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं. आजही त्या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळत आहे. याव्यतिरिक्त, कुणबी नोंदीसाठी न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना, 'सारथी' संस्थेमार्फत विविध कोर्सेस, अण्णासाहेब विकास महामंडळातून बिनव्याजी कर्ज आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलसाठी भाडे देण्याची योजना सुरू केल्या. तर फडणवीस सरकारच्या काळात मिळालेले मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. पण सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आले नाही. त्या काळात आरक्षणासाठी लक्ष द्यायला हवं होतं. दुर्दैवाने ते झालं नाही, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

पुढे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले की, मराठा समाजाला आरक्षण देत असताना सरकार कोणत्याही समाजावर अन्याय करणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करून मराठ्यांना मिळावं अशी मराठा समाजाची भूमिका नाही. कुणाचंही आरक्षण कमी करून देणं हे करता येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. 


सम्बन्धित सामग्री