Wednesday, September 03, 2025 09:05:40 AM

नाना पटोले आरएसएसचे एजंट काँग्रेस उमेदवाराचा आरोप

&quotआपण आरएसएस एजंट नाना पटोलेचे शिपाई नाही, राहुल गांधी यांचे शिपाई आहोत&quot 

नाना पटोले आरएसएसचे एजंट काँग्रेस उमेदवाराचा आरोप 

नागपूर : काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना आरएसएसचे एजंट असल्याचे बोलले आहे. बंटी शेळके यांच्या म्हणण्यानुसार, नाना पटोले हे काँग्रेस संघटन कमजोर करण्याचे काम करत आहेत आणि त्यांनी स्वतः काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मदत न करता पक्षाच्या पद्धतीला नुकसान पोहोचवले आहे.

बंटी शेळके यांनी एका निवेदनात म्हटले की, "नाना पटोले यांचा शिपाई नसून राहुल गांधी यांचा शिपाई आहे. काँग्रेसच्या पक्ष संघटनेवर नाना पटोले यांची द्वेषभावना आहे." त्यांनी असेही सांगितले की, "नाना पटोले यांच्या मतदारसंघातील देवरी बॉर्डरवर आरटीओ विरोधात केलेल्या आंदोलनावर नाना पटोले यांनी एकही शब्द बोलला नाही."

नाना पटोले यांच्यावर शरद पाटील, प्रवीण दटके यांच्या बाबतीत केलेल्या आरोपांना बंटी शेळके यांनी चांगलाच विरोध केला. "भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांनी इरफान काजीला २० लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली, परंतु नाना पटोले यांनी त्यावर काही बोलले नाही," असे शेळके यांनी म्हटले.

शेळके यांचे आरोप अधिक गंभीर होते ज्यात त्यांनी नमूद केले की, काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाने त्यांना उमेदवारी देताना त्यांचे नाव काढले आणि प्रियंका गांधी यांच्या प्रचारासाठी कुठलीही मदत दिली नाही.

"काँग्रेसचे वकील सेल कुठे गेले होते, जेव्हा माझ्यावर कारवाई झाली आणि लोकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली," असे शेळके यांनी पोलखोल केली. तसेच, त्यांनी एक धक्कादायक आरोप केला की, "संघ मुख्यालय समोर आरएसएसचे वेश जाळण्याचे काम मी केले, परंतु नाना पटोले त्यावर एकही शब्द बोलले नाही."

बंटी शेळके यांचे आरोप नागपूरमधील राजकारणाला एक नवा वळण देणारे आहेत, आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, येत्या काही दिवसांत त्यांना आणखी खुलासे करायचे आहेत.

"आरएसएस एजंट नाना पटोले यांना आव्हान देत म्हटले की माझा रक्ताचा प्रत्येक थेंबात काँग्रेसच लिहिलेला आहे," असे शेळके यांनी सांगितले. शेळके यांनी त्यांचा निर्धार व्यक्त करत, "आपण आरएसएस एजंट नाना पटोलेचे शिपाई नाही, राहुल गांधी यांचे शिपाई आहोत," असे म्हटले.

यावेळी, त्यांनी भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या मुलाच्या अपघाताच्या प्रकरणी नाना पटोले यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याचे देखील म्हटले. अशा सर्व आरोपांमुळे काँग्रेसच्या अंतर्गत वाद आणि संघटनातील दुरवस्था अधिक स्पष्ट होत आहे.


सम्बन्धित सामग्री