Wednesday, August 20, 2025 10:26:21 PM

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार?

लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत परंतु त्यासाठी आता निकष कडक केले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार

मुंबई : महायुती सरकारसाठी सर्वात महत्वाची आणि गेम चेंजर योजना ठरली ती 'लाडकी बहीण योजना'. निकाल लागल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे काय होणार हा प्रश्न सर्वांचं पडला होता. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजेनबद्दल माहिती दिली आहे. विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत परंतु त्यासाठी आता निकष कडक केले जाणार आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? 

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून महिलांना 2100 रुपये दिले जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. अर्थसंकल्पावेळी यासंदर्भात विचार करू. आमचे आर्थिक स्त्रोत यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात येणार' असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. त्याचबरोबर निवडणूक प्रचारादरम्यान जी आश्वसने दिली आहेत ती पूर्ण करू. ही आश्वासन पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते ती आधी करू. तसेच निकषाच्या बाहेर कोणी भेटला , तक्रारी आल्या तर त्याचा पुनर्विचार ही केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून महिलांना 2100 रुपये दिले जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. परंतु त्यासाठी आता निकष कडक देखील केले जाणार आहेत.
 
 
 


सम्बन्धित सामग्री