Wednesday, August 20, 2025 01:07:47 PM

अजित पवार यांना आयकर विभागाकडून क्लीन चिट

पवार कुटुंबियांना क्लीन चिट. 2021 मध्ये कुटुंबीयांची मालमत्ता जप्त . जप्त केलेली मालमत्ताही न्यायालयाने सोडली. दिल्ली न्यायाधिकरण न्यायालयाचा निर्णय.

अजित पवार यांना आयकर विभागाकडून क्लीन चिट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. आयकर विभागाकडून पवार कुटुंबीयांना क्लीन चिट देण्यात आली आहे. शपथ घेतल्यानंतर पवार कुटुंबीयांना क्लीन चिट देण्यात आली आहे. 

काय आहे प्रकरण? 

दिनांक 7 ऑक्टोबर 2021 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यावेळी त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये आयकर विभागाने छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांवर टाच आणून ती जप्त करण्यात आली होती. त्याशिवाय एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टवरही जप्ती आणल्याचं त्यावेळी समोर आले होते.

आयकर विभागाने संपत्ती जप्त केल्यानंतर अजित पवार यांनी कोर्टात धाव घेतली होती. आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवलेला नाही, असे अजित पवार यांनी कोर्टात सांगतले होते. आता दोन वर्षानंतर याबाबत निर्णय झाला आहे. शुक्रवारी दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना मोठा दिलासा देत आयकर विभागाची अपील फेटाळली. अजित पवारांची जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले आहेत.

दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार, ही संपत्ती मुक्त करण्यात येणार असून लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबाकडे ही संपत्ती सुपूर्द करण्यात येणार आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा देण्यात आला असून आयकर विभागाकडून पवार कुटुंबीयांना क्लीन चिट देण्यात आली आहे. 


 


सम्बन्धित सामग्री