Monday, September 01, 2025 01:20:16 PM

भाजपाकडून जळगाव विधानसभेसाठी सुरेश भोळे यांची उमेदवारी जाहीर

&quotदेव, देश, आणि राष्ट्रधर्म या पद्धतीने गेल्या दहा वर्षांत माझी कामगिरी राहिली आहे. काही कामे राहिलेली आहेत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. यावेळीही जनता मला आशीर्वाद देईल, असा विश्वास आहे,&quot

भाजपाकडून जळगाव विधानसभेसाठी सुरेश भोळे यांची उमेदवारी जाहीर

जळगाव : भारतीय जनता पक्षाने जळगाव विधानसभेसाठी आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या सर्व भाजप नेत्यांचे सुरेश भोळे यांनी आभार मानले.

सुरेश भोळे म्हणाले, "दोनदा आमदार झाल्यानंतर आता तिसऱ्यांदा माझ्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल मी खूप आभारी आहे. गेल्या दहा वर्षांत ज्या पद्धतीने काम केले, त्याच पद्धतीने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील."

त्यांनी महायुतीच्या नेत्यांचेही आभार मानले आणि कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले. "देव, देश, आणि राष्ट्रधर्म या पद्धतीने गेल्या दहा वर्षांत माझी कामगिरी राहिली आहे. काही कामे राहिलेली आहेत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. यावेळीही जनता मला आशीर्वाद देईल, असा विश्वास आहे," असे सुरेश भोळे यांनी स्पष्ट केले.


सम्बन्धित सामग्री