Sunday, August 31, 2025 06:26:53 AM

नायब सिंह सैनी झाले हरियाणाचे मुख्यमंत्री

नायब सिंह सैनी यांनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सैनी ५४ वर्षांचे आहेत आणि ओबीसी समाजाचे आहेत.

नायब सिंह सैनी झाले हरियाणाचे मुख्यमंत्री

चंदिगड : नायब सिंह सैनी यांनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सैनी ५४ वर्षांचे आहेत आणि ओबीसी समाजाचे आहेत. सलग दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाले. हरियाणाच्या विधानसभेतील ९० पैकी ४८ जागांवर विजय मिळवत भाजपाने बहुमत मिळवले. सलग तिसऱ्यांदा भाजपाने हरियाणात सत्ता स्थापन केली. काँग्रेसने हरियाणात ३७ जागांवर विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सैनींच्या शपथविधीला उपस्थित होते.

  1. नायब सिंह सैनी सलग दुसऱ्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री
  2. सैनींसोबत १३ मंत्र्यांनी घेतली शपथ
  3. सैनींच्या मंत्रिमंडळात दोन महिला मंत्री
  4. हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजपाची सत्ता

सम्बन्धित सामग्री