Sunday, August 31, 2025 09:06:00 PM

छोटा राजनला जामीन, पण तुरुंगातच राहणार

गुंड छोटा राजनला हॉटेल मालक जया शेट्टीच्या हत्येच्या प्रकरणात जामीन मिळाला. पण इतर प्रकरणांमध्ये त्याला जामीन मिळालेला नाही.

छोटा राजनला जामीन पण तुरुंगातच राहणार

मुंबई : गुंड छोटा राजनला हॉटेल मालक जया शेट्टीच्या हत्येच्या प्रकरणात जामीन मिळाला. पण इतर प्रकरणांमध्ये त्याला जामीन मिळालेला नाही. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात जामीन दिला तरी छोटा राजनची तुरुंगातून सुटका होणार नाही. 

हॉटेल मालक जया शेट्टीची २००१ मध्ये हत्या झाली होती. या प्रकरणात छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीश असलेल्या खंडपीठाने जामीन मंजूर केला. छोटा राजनला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. तसेच त्याची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्यात आली.

तपासावेळी छोटा राजनचा सहकारी हेमंत पुजारी खंडणीसाठी जया शेट्टीला धमकावत होता अशी माहिती तपास पथकाच्या हाती आली. या माहितीआधारे तपास करुन हत्या प्रकरणात छोटा राजनला अटक करण्यात आली.

छोटा राजन सध्या पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सुरक्षिततेसाठी छोटा राजनला दिल्लीच्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री