BSNL Freedom Offer For Independence Day : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने स्वातंत्र्यदिनानिमित्त एक अतिशय परवडणारी आणि आकर्षक ऑफर लाँच केली आहे. या ऑफर अंतर्गत, फक्त 1 रुपयांत ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग, दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा आणि दररोज 100 एसएमएस मोफत मिळत आहेत. ही ऑफर विशेषतः नवीन बीएसएनएल ग्राहकांसाठी आहे, ज्याचा उद्देश कंपनीचे अपग्रेड केलेले नेटवर्क जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आहे.
बीएसएनएलची नवीन 'फ्रीडम ऑफर'
बीएसएनएलने या ऑफरची माहिती त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर दिली जिथे त्याचे नाव 'ट्रू डिजिटल फ्रीडम' असे ठेवण्यात आले आहे. जर ग्राहकांनी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान नवीन बीएसएनएलचे सिम कार्ड घेतले तर त्यांना फक्त 1 रुपयाच्या रिचार्जवर संपूर्ण 30 दिवसांसाठी या सर्व सुविधा मिळतील. या प्लॅनमध्ये देशभरात अमर्यादित कॉलिंग, दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएसचा समावेश आहे.
हेही वाचा - AI तुमच्या बँक बॅलन्सवर लक्ष ठेवून आहे? आवाजाची नक्कल करून फसवणूक करू शकते, सॅम ऑल्टमन यांचा इशारा
ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे आणि देशातील सर्व सर्कलमध्ये लागू करण्यात आली आहे. ग्राहक फक्त 1 रुपयांमध्ये बीएसएनएलच्या कोणत्याही अधिकृत केंद्रातून नवीन सिम कार्ड घेऊन या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात.
घटत्या वापरकर्त्यांच्या संख्येत ARPU वाढवण्याचे प्रयत्न
TRAI च्या अलीकडील अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत बीएसएनएल आणि व्हीआयमधील लाखो वापरकर्त्यांनी इतर कंपन्यांमध्ये पोर्ट केले आहे. कमी होत चाललेल्या वापरकर्त्यांच्या संख्येमुळे, बीएसएनएलने त्यांची मार्केटमधील जागा पुन्हा मजबूत करण्यासाठी ही आक्रमक रणनीती स्वीकारली आहे.
सरकारने बीएसएनएलला प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU -Average Revenue Per User ) वाढवण्याचे लक्ष्य दिले आहेत. परंतु, यासाठी टॅरिफ किमती वाढवू नयेत, असे निर्देश देखील दिले आहेत. आता दर महिन्याला यावर आढावा घेण्यासाठी बैठका घेतल्या जातील. जेणेकरून, सुधारणांवर लक्ष ठेवता येईल.
हेही वाचा - मायक्रोसॉफ्टने 15 हजार लोकांना कामावरून कमी केल्यानंतर सत्य नाडेला यांचं पत्र; भविष्याबद्दल हे सांगितलं
एअरटेलचा नवीन प्लॅन
एअरटेलने अलीकडेच 399 रुपयांचा नवीन प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे आणि त्यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, हाय-स्पीड डेटा आणि मोफत राष्ट्रीय रोमिंग (जम्मू आणि काश्मीर वगळता) मिळते. वापरकर्त्यांना दररोज 2.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मोफत मिळतात. तसेच, या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे, ज्याचा फायदा ओटीटी कंटेंट प्रेमींना देखील होईल.