मुंबई : मुंबईतील विक्रोळीत शिउबाठाचे नेते व माजी महापौर दत्ता दळवी यांना फेरीवाल्यांकडून शिवीगाळ करत धक्काबुक्की दिल्याचा प्रकार समोर आला आहे. विक्रोळीतील मध्यवर्ती शिउबाठाच्या शाखेजवळ असलेल्या काही फेरीवाल्यांनी रस्त्यावर जागा अडवून धंदे लावले होते. त्यामुळे रस्त्यात अडचण होत असल्यामुळे माजी महापौर दत्ता दळवी यांनी तिथले प्लास्टिकचे क्रेट बाजूला केले. यामुळे फेरीवाल्यांनी दत्ता दळवी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या प्रकरणाचा सीसीटिव्ही देखील आता समोर आला आहे.
अनेकवेळी फेरीवाले ग्राहकांबरोबर भांडण काढताना देखील दिसून येतात. तसेच या घटनेमुळे त्यांची दादागिरी समोर आली आहे.