Sunday, September 21, 2025 05:34:06 PM

Aadhaar Card Biometric Update: आधार कार्डसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुलांच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क माफ

सरकारच्या नव्या नियमानुसार, 5 ते 7 वर्षे आणि 15 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना हा निर्णय लागू होईल. यामुळे मोठ्या संख्येने कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

aadhaar card biometric update आधार कार्डसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय मुलांच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क माफ

Aadhaar Card Biometric Update: केंद्र सरकारने आधार कार्डधारकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता मुलांच्या नवीन नोंदणीसाठी आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आतापर्यंत या प्रक्रियेसाठी 50 रुपये शुल्क घेतले जात होते.

कोणत्या वयोगटाला लागू होणार?

सरकारच्या नव्या नियमानुसार, 5 ते 7 वर्षे आणि 15 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना हा निर्णय लागू होईल. यामुळे मोठ्या संख्येने कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, सरकारने मुलांसाठी आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य केले आहे.

हेही वाचा - GST 2.0 : 22 सप्टेंबरपासून लागू होणार नवे दर, सलूनपासून जिमपर्यंत काय होणार स्वस्त आणि महाग

बायोमेट्रिक अपडेट कसे करावे?

जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.
UIDAI ची अधिकृत वेबसाइट किंवा mAadhaar अॅपवरून केंद्राचा पत्ता शोधता येईल.
केंद्रातून आधार नोंदणी/अपडेट फॉर्म मिळवा व भरा.
आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा.
केंद्रातील ऑपरेटर फिंगरप्रिंट स्कॅन, आयरीस स्कॅन किंवा दोन्ही करून बायोमेट्रिक डेटा अपडेट करेल.

हेही वाचा - Personal Loan च्या ओझ्याखाली दबले आहात? या 6 उपायांनी कर्जाचा भार कमी करा

UIDAI ची कडक अंमलबजावणी -

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्रे पाठवून मुलांच्या आधार अपडेट प्रक्रियेची गती वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य केल्यामुळे प्रत्येक मुलाचे अद्ययावत आणि सुरक्षित डिजिटल ओळखपत्र उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे मुलांचे ओळखपत्र अधिक अचूक आणि सुरक्षित होण्यास मदत होणार असून, पालकांना शुल्काचा भारही पडणार नाही.


सम्बन्धित सामग्री