सांगली: शुक्रवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं. इतकंच नाही, तर पडळकरांनी जयंत पाटील यांच्या वडिलांविरोधातही वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे, राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच, आता एक नवीन बातमी समोर आली आहे. बापू बिरू वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजी वाटेगावकरांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांना स्पष्ट शब्दात इशारा दिला. या घटनेमुळे, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा: Laxman Hake: ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांचा कथित ऑडिओ कॉल व्हायरल
शिवाजी वाटेगावकर काय म्हणाले?
'गोपीचंद पडळकरांना समाजात काडीचीही किंमत नाही. तुम्ही जत तालुक्यातून निवडून येऊन दाखवा. गोपीचंद पडळकरांना लाज वाटली पाहिजे की आपण कोणाबद्दल काय बोलत आहोत आणि किती खालच्या पतळीवर बोलत आहोत. जयंत पाटील काय तुम्हाला फालतू माणूस वाटले का? त्यांच्या नादाला लागू नका', असा स्पष्ट इशारा बापू बिरू वाटेगावकर यांचे पुत्र शिवाजी वाटेगावकरांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांना दिला.
पुढे, शिवाजी वाटेगावकरांनी गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल करत म्हणाले की, 'गोपीचंद पडळकरांनी धनगर समाजाची मान खाली घालायला लावली. बापू बिरू वाटेगावकरसारख्या व्यक्तींबद्दल बोलायला तू एवढा मोठा झाला का? जर वाळवा तालुक्यात येण्याचं प्रयत्न केला, तर तुझे कपडे काढून परत पाठवणार'.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांना फोन केला. त्यानंतर, पडळकरांची प्रतिक्रिया समोर आली. ते म्हणाले की, 'मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. तुम्ही वादग्रस्त वक्तव्य करू नका, अशी सूचना त्यांनी मला दिली. ते मला जे काही निर्देश देतील, ते मी पाळेन'.