Shardiya Navratri Kalash Sthapana Muhurat 2025 : द्रिक पंचांगानुसार, शारदीय नवरात्रातील आश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी 22 सप्टेंबर रोजी पहाटे 01:23 वाजता सुरू होते. ही तिथी 23 सप्टेंबर रोजी पहाटे 02:55 वाजता संपेल. उदयतिथीनुसार, शारदीय नवरात्राचा पहिला दिवस 22 सप्टेंबर रोजी येतोय.
नवरात्राची सुरुवात आश्विन शुक्ल प्रतिपदेला कलश स्थापनेने होते. कलश स्थापना करून, देवी दुर्गेचे आवाहन केले जाते, तिच्या आगमनाने नवदुर्गा पूजा सुरू होते. हे नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांच्या पूजेसाठी समर्पित असतात. या काळात दुर्गा माता पृथ्वीवर निवास करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे, आणि भक्तांचे दुःख व संकट दूर करते. या वर्षी कलश स्थापनेसाठी तीन शुभ मुहूर्त आहेत. मातीच्या भांड्याला घट म्हणतात, घटस्थापना विधीला नवरात्रामध्ये विशेष महत्त्व आहे.
घटस्थापनेचे शुभ मुहूर्त आणि कलश स्थापनासाठी शुभ वेळ
नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने (Ghatsthapna) होते. पंचांगानुसार, या वर्षी घटस्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत:
पहिला मुहुर्त : 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 09 मिनिटांपासून ते 07 वाजून 40 मिनिटांपर्यंत.
दुसरा मुहुर्त : सकाळी 09:11 ते 10:43 पर्यंत आहे. या वेळी तुम्ही घटस्थापना आणि पूजा देखील करू शकता.
तिसरा मुहुर्त (अभिजीत मुहूर्त) : ज्यांना सकाळी कलश स्थापना करता येत नाही त्यांच्यासाठी दुपारी अभिजित मुहूर्त हा सर्वोत्तम वेळ आहे. कलश स्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 पर्यंत आहे.
हेही वाचा - Kolkata Durga Puja 2025: कोलकात्यात नक्की भेट द्यावेत असे खास पंडाल
घटस्थापना करण्याची योग्य पद्धत
- स्थापनेची जागा: घटस्थापनेसाठी घराची उत्तर किंवा उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशा शुभ मानली जाते.
- कलश तयार करा: सकाळी स्नान वगैरे झाल्यावर कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यात नाणे, फुले आणि अक्षता टाका.
- कलशाची पूजा: कलशावर स्वस्तिक चिन्ह काढा आणि त्यावर लाल-पिवळा दोरा (कलावा) बांधा. हा दोरा पांढऱ्या दोऱ्याला हळद-कुंकू लावूनही तयार करता येतो.
- नारळाची स्थापना: लाल रंगाच्या साडीच्या तुकड्यात (चुनरी) नारळ गुंडाळून तो कलशावर ठेवा.
- दीप प्रज्वलन: शुद्ध तुपाचा दिवा लावून दुर्गा मातेची पूजा करा, व्रत कथा वाचा आणि फळे व मिठाईचा नैवेद्य अर्पण करा.
शुक्ल योगातील कलश स्थापना -
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनाच्या वेळी शुक्ल योग तयार होत आहे. शुक्ल योग सकाळी 07:59 पर्यंत राहील. या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळी 11:24 पर्यंत आहे. त्यानंतर हस्त नक्षत्र प्रभावी आहे.
कलश स्थापनेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 04:35 ते 05:22 पर्यंत असतो, तर सकाळचा संध्या मुहूर्त पहाटे 04:58 ते 06:09 पर्यंत असतो, विजय मुहूर्त दुपारी 02:15 ते 03:03 पर्यंत असतो.
नवरात्रीच्या महत्त्वाच्या तारखा
घटस्थापना: 22 सप्टेंबर
महाअष्टमी: 30 सप्टेंबर
महानवमी: 1 ऑक्टोबर
दसरा (विजयादशमी): 2 ऑक्टोबर
हेही वाचा - Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्रीत देवीची पूजा करताना ही फुले नक्की अर्पण करा
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)