Sunday, September 21, 2025 08:46:43 PM

PM Modi On GST 2.0 Reforms: 'GST सुधारणांमुळे सामान्य माणसाची स्वप्ने साकार होणार...'; राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधानांनी 22 सप्टेंबरपासून देशभरात जीएसटी बचत महोत्सव सुरू होणार असल्याची माहिती दिली.

pm modi on gst 20 reforms gst सुधारणांमुळे सामान्य माणसाची स्वप्ने साकार होणार राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी काय म्हणाले

PM Modi On GST 2.0 Reforms: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 'जीएसटी बचत महोत्सवा'बद्दल शुभेच्छा दिल्या. मोदींनी सांगितले की, गरीब आणि मध्यमवर्गीयांना आता दुहेरी लाभ मिळणार आहेत. GST सुधारणांमुळे सामान्य माणसाची स्वप्ने साकार होणार आहेत. गेल्या 11 वर्षांत 25 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली असून हा वर्ग आता नव-मध्यमवर्ग म्हणून उदयास आला आहे. या वर्गाची देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका आहे. या नव-मध्यमवर्गाच्या स्वतःच्या आकांक्षा आणि स्वप्ने लक्षात घेऊन सरकारने यावर्षी 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करमुक्त केले आहे. हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे मध्यमवर्गीयांचे जीवन सुलभ आणि आरामदायी होईल. 

पंतप्रधानांनी सांगितले की गरीब, नव-मध्यमवर्गीय आणि पारंपारिक मध्यमवर्गीय सर्वांना दुहेरी लाभ मिळत आहेत. एकीकडे आयकर सवलत, तर दुसरीकडे जीएसटी कपात, ज्यामुळे दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. पंतप्रधानांनी 22 सप्टेंबरपासून देशभरात जीएसटी बचत महोत्सव सुरू होणार असल्याची माहिती दिली. या सुधारणा भारताच्या विकासाला गती देतील, व्यवसाय सुलभ करतील आणि गुंतवणूक आकर्षक बनवतील, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं. 

हेही वाचा - GST 2.0 : 22 सप्टेंबरपासून लागू होणार नवे दर, सलूनपासून जिमपर्यंत काय होणार स्वस्त आणि महाग

नवीन जीएसटीमध्ये फक्त 5 टक्के आणि 18 टक्के कर स्लॅब राहतील, ज्यामुळे 99 टक्के दैनंदिन वस्तू आता 5 टक्के कर श्रेणीत येणार आहेत. दरम्यान, मोदींनी यावेळी स्वदेशी चळवळीला देखील महत्त्व दिले. त्यांनी सांगितले की देशात जे काही उत्पादन करता येईल ते देशांतर्गत उत्पादन केले पाहिजे, ज्यामुळे स्वावलंबी भारताचे मार्गदर्शन होईल. लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना देखील जीएसटी कपात आणि सोपे नियम मोठा फायदा देतील.

हेही वाचा - Amul Products : मोठी बातमी! अमूल उत्पादनांच्या किंमतीत घट ; बटरपासून 'या' वस्तू होणार स्वस्त

याशिवाय, पंतप्रधान मोदी यांनी 'नागरिक देवो भव' हा मंत्र दिला. यासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले की, या जीएसटी सुधारणा देशवासियांना त्यांच्या स्वप्नांना साध्य करण्यास मदत करतील, तसेच आत्मनिर्भर भारतास गती देतील. आपण अशा वस्तू खरेदी केल्या पाहिजेत ज्या आपल्या तरुणांच्या कष्टाचे आणि आपल्या मुला-मुलींच्या घामाचे प्रतिबिंब असेल. आपण प्रत्येक घराला स्वदेशीचे प्रतीक बनवले पाहिजे. 


सम्बन्धित सामग्री