IND vs PAK: आशिया कपमधील सुपर फोर टप्प्यातील रोमांचक सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगला आहे. आशिया कपमध्ये गट टप्प्यात पाकिस्तानला एकतर्फी पराभव देणाऱ्या टीम इंडियाचा आत्मविश्वास चांगलाचं वाढला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
कर्णधार सूर्यकुमार यादवने भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांच्या ऐवजी जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती संघात परतले आहेत. पाकिस्तानकडून हसन नवाज आणि खुशदिल शाह यांना वगळण्यात आले असून त्यांची जागा इतर खेळाडूंनी घेतली आहे.
हेही वाचा - India Vs Pakistan Asia Cup 2025 : पाकिस्तान संघाची जिरवण्यासाठी 'हा' स्टार खेळाडू सज्ज; माजी क्रिक्रेटपटू सुनील गावस्कर आणि रवी शास्त्रींनी केलं कौतुक
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 7:30 वाजता घेण्यात आला. नेहमीप्रमाणे या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीसाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली. गेल्या नऊ टी-20 सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने आठ वेळा विजय मिळवला आहे. फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला होता. त्यामुळे भारताने गोलंदाजीचा निर्णय घेणे योग्य ठरल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा - India V/S Pakistan: ICC ने पाकिस्तानची जिरवली, ऍन्डी पायक्रॉफ्ट पुन्हा रेफरी
पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन: सॅम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आघा (कर्णधार), हुसेन तलत, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
भारताचा प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती. भारत-पाकिस्तानमधील हा सामना पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींसाठी उत्कंठा वाढवणारा ठरत आहे.