Monday, September 22, 2025 12:08:47 AM

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' नव्या निर्णयाने अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसला फटका; जाणून घ्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक H-1B व्हिसाचे शुल्क तब्बल 80 लाखांपर्यंत वाढवल्याने अमेरिकन कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

donald trump  डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या निर्णयाने अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसला फटका जाणून घ्या

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक H-1B व्हिसाचे शुल्क तब्बल 80 लाखांपर्यंत वाढवल्याने अमेरिकन कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे, सध्या सुट्ट्यांसाठी भारतात आलेले कर्मचारी आणि पुढील आठवड्यात भारतात येण्याचा बेत आखणाऱ्या अनेकांच्या समस्येत वाढ झाली आहे. 

काही अमेरिकन कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तातडीने आदेश दिले आहेत की, 'तात्काळ अमेरिकेत परत या, अन्यथा एक लाख डॉलर्स भरा'. हा आदेश मिळताच अनेक कर्मचाऱ्यांनी मिळेल त्या किंमतीत फ्लाइट तिकीट घेऊन घाईगडबडीत अमेरिकेला परतीचा प्रवास सुरू केला. इतकंच नाही, तर दिल्ली - न्युयॉर्क या मार्गावरील एका मार्गाचे इकॉनॉमी तिकीट शनिवारी दुपारी तब्बल 1.05 लाख रुपयांपर्यंत पोहोचले होते.  

हेही वाचा: Palestinian State Recognition: अमेरिका-इस्रायलला मोठा धक्का! ब्रिटन-ऑस्ट्रेलिया-कॅनडाने दिली पॅलेस्टाईनला मान्यता

ही परिस्थिती केवळ सध्या सुट्टीसाठी आलेल्या प्रवाशांपुरती मर्यादित नाही. दिवळीत भारतात येण्याचा बेत आखलेले अनेक भारतीय आयटी कर्मचारी आणि व्यावसायिकांनी आपला प्रवास रद्द केला आहे. काहींच्या घरात दिवाळीनंतर लग्नाचे सोहळे नियोजित होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे त्यांना त्यांचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. 

दरम्यान, एक्स युजर कौस्तव मजूमदार यांनी पोस्ट करत म्हटले की, 'सॅन फ्रान्सिस्को विमानतळावरून भारतात दुर्गापूजेसाठी येणाऱ्या प्रवाशांनी भरलेले एक विमान उड्डाणासाठी सज्ज होते. मात्र, जेव्हा व्हिसा शुल्कवाढीची बातमी समोर आली, तेव्हा अनेक कर्मचाऱ्यांनी घाबरून विमानातून उतरण्याची मागणी केली. मात्र, विमानाची तयारी पूर्ण झाल्याने ही मागणी नाकारण्यात आली'. या संपूर्ण घडामोडीमुळे अमेरिकेत काम करणाऱ्या हजारो भारतीयांचे भविष्य डळमळीत झाले आहे. व्हिसा शुल्कवाढ किती काळ लागू राहणार आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम काय होणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 


सम्बन्धित सामग्री