मुंबई: राज्याच्या राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. नुकताच, भाजपचे नेते अमित साटम यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 'एन्काउंटर विथ वृषाली कदम' ला मुलाखत दिली. यादरम्यान, भाजपचे नेते अमित साटम यांनी मुंबईतील मोकळ्या जागा बीएमसी खाजगी संस्थांना देण्याचे धोरण बीएमसीने आखल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. साटम म्हणाले की, 'मुंबईतील सर्व जागा, मैदान आणि उद्यान ही महानगरपालिकेनेच मेंटेन केली पाहिजे'.
हेही वाचा: Mumbai: न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन! वांद्रे तलावाजवळ कबुतरांना खायला घालणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अमित साटम काय म्हणाले?
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या संपादिका वृषाली कदम परब यांनी भाजपचे नेते अमित साटम यांना सवाल केला. 'मुंबईत ज्या मोकळ्या जागा आहेत, त्या खाजगी संस्थांना देण्याचं धोरण बीएमसीने आखलेलं आहे. या धोरणाला तुम्ही विरोध करत आहात. त्याचं नेमकं काय झालं आणि ते आता कुठपर्यंत आलं आहे?'.
यावर भाजपचे नेते अमित साटम म्हणाले की, 'आमचं हे स्पष्ट मत आहे की मुंबईतील सर्व जागा, मोकळ्या मैदान आणि उद्यान ही महानगरपालिकेनेच मेंटेन केली पाहिजे. ती कोणत्याही खाजगी संस्था, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, इन्सिट्यूशन कोणालाही देता कामा नये. महानगरपालिकेने मुंबईतील सर्व जागा, मोकळ्या मैदान आणि उद्यान स्वत: मेंटेन करावी. तेथील ज्या स्थानिक संस्था, एनजीओ, एएलएम किंवा सिटीजन्स ग्रुप असतात, त्यांनी एका वॉचडॉगप्रमाणे त्याठिकाणी काम करावं. त्यातील ज्या त्रुटी असतील, त्याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधावं. परंतु, मुंबईतील सर्व जागा, मोकळ्या मैदान आणि उद्यानाचा मेंटेनन्स महानगरपालिकेनेचं करावं. तसेच, कोणत्याही प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला त्या मोकळ्या जागा देण्यात येऊ नये, असं आमचं धोरण आहे'.