Saturday, September 20, 2025 02:28:02 PM

Mumbai Railway Megablock : उद्या प्रवासापूर्वी रेल्वेचं वेळापत्रक नक्की बघा; मेगाब्लॉकमुळे होऊ शकतो मनस्ताप

या रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर नियोजित ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

mumbai railway megablock  उद्या प्रवासापूर्वी रेल्वेचं वेळापत्रक नक्की बघा मेगाब्लॉकमुळे होऊ शकतो मनस्ताप

मुंबई : मुंबई लोकल ही मुंबईकरांच्या जीवनरेषेचा अविभाज्य भाग मानला जातो. मात्र, या रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर नियोजित ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. रेल्वे प्रशासनाने देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हे ब्लॉक जाहीर केले असून, ट्रॅक व सिग्नल सुधारणा यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे.

हार्बर मार्गावर मोठा मेगा ब्लॉक

पनवेल–वाशी दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक राहील. या कालावधीत CSMT ते पनवेल व बेलापूरकडे धावणाऱ्या तसेच परतीच्या गाड्या पूर्णपणे रद्द राहतील. यामुळे हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ठाणे–पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा देखील बंद असेल. मात्र, CSMT–वाशी आणि ठाणे–वाशी/नेरूळ मार्गावरील लोकल गाड्या नियमित धावतील.

पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री मेगा ब्लॉक

वसई रोड–विरारदरम्यानचा ब्लॉक शनिवारी रात्री 12.15 पासून रविवारी पहाटे 4.15 पर्यंत राहणार आहे. या काळात धीम्या मार्गावरील लोकल्स जलद मार्गावर वळवण्यात येतील. काही गाड्या रद्द तर काही उशिराने धावतील. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा ब्लॉक फक्त रात्रीच असल्यामुळे रविवारी दिवसभर पश्चिम रेल्वेवर कोणताही परिणाम होणार नाही.

रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासावे आणि पर्यायी व्यवस्था करावी. देखभाल कामांमुळे होणाऱ्या असुविधेबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.


सम्बन्धित सामग्री