Team India Record in Dubai: दुबईत टीम इंडियाला हरवणं कठीण! ‘हा’ जबरदस्त रेकॉर्ड बघाच
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी 24 तासापेक्षा कमी वेळ राहिला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. उभय संघातील हा सामना पाकिस्तानच्या कराची येथील नॅशनल स्टेडियममध्ये होत असून याला उद्या दुपारी 2:30 वाजता सुरूवात होईल. टीम इंडियाचे या स्पर्धेतील सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. तर उर्वरित सर्व संघाचे सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाचा ‘अ’ गटात समावेश आहे. टीम इंडियाचे सामने बांगलादेश (20 फेब्रुवारी), पाकिस्तान (23 फेब्रुवारी) आणि न्यूझीलंड (2 मार्च) यांच्याविरुद्ध होणार आहेत. 4 आणि 5 मार्चला सेमीफायनल तर 9 मार्चला फायनलचा सामना रंगणार आहे. महत्वाचे म्हणजे, टीम इंडियाचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. या मैदानावर टीम इंडियाचा रेकॉर्ड 'फस्ट क्लास' आहे.
टीम इंडियाचा दुबईतील विक्रमी रेकॉर्ड पाहता विरोधी संघांसाठी ही धडकी भरवणारी बाब आहे. टीम इंडियाने दुबईच्या मैदानावर 2018 पासून एकही सामना गमावलेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 5 सामने टीम इंडियाने जिंकले आहे. तर राहिलेला एक सामना अनिर्णित झाला होता.
हेही वाचा - Zaheer Khan Purchase Apartment In Mumbai: झहीर खानने मुंबईत खरेदी केले 11 कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट
दुबईत टीम इंडिया अपराजित आहे. याशिवाय टीम इंडियात स्टार खेळाडूंचा भरणा आहे. यामुळे चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलसाठी टीम इंडिया फेवरेट आहे. अनेक दिग्गज खेळाडूंच्या मते, टीम इंडिया चॅम्पियन ट्रॉफीच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. या स्पर्धेत विराट कोहली, रोहित शर्मा हे खेळाडू मोठी खेळी साकारणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
हेही वाचा - Champions Trophy 2025: हेच ४ संघ पोहोचणार सेमीफायनलमध्ये, दिग्गजांचा अंदाज
टीम इंडियाचा कस्सून सराव
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी सुरू केली आहे. संघाने रविवारपासून दुबईतील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सराव सुरू केला आहे. यात संघातील सर्वच खेळाडूंनी भाग घेत घाम गाळला. या दरम्यान, रोहित शर्माचा एक सराव करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात तो सराव सत्रात मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना दिसून येत आहे.