मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवले. भाजपा 133, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 41 अशा प्रकारे महायुतीने एकूण 231 जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली. विधानसभेच्या 288 पैकी 230 जागांवर सरशी साधल्यानंतर महायुतीने पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय एकत्रितपणे घेणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिली. मुख्यमंत्री या पदासाठी निकष निश्चित केलेले नाही. अंतर्गत चर्चेतून लवकरच निर्णय घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर आधी तिन्ही पक्षांची विधानसभेतील नेते निश्चित करण्यासाठी अंतर्गत बैठक होईल. नंतर नेते आपापसांत चर्चा करुन मुख्यमंत्री ठरवतील; असे अजित पवार म्हणाले.
भाजपाचे विजयी उमेदवार
- शहादा - राजेश उदेसिंग पाडवी
- नंदुरबार - डॉ.विजयकुमार कृष्णराव गावित
- धुळे शहर - अग्रवाल अनुपभैय्या ओमप्रकाश
- शिरपूर - काशिराम वेचन पावरा
- रावेर - अमोल हरिभाऊ जावळे
- भुसावळ - सावकारे संजय वामन
- जळगाव शहर - सुरेश दामू भोळे (राजू मामा)
- चाळीसगाव - मंगेश रमेश चव्हाण
- जामनेर - गिरीश दत्तात्रय महाजन
- मलकापूर - चैनसुख मदनलाल संचेती
- खामगाव - आकाश पांडुरंग फुंडकर
- जळगाव (जामोद) - कुटे संजय श्रीराम
- अकोट - प्रकाश गुणवंत भारसाकळे
- अकोला पूर्व - रणधीर प्रल्हादराव सावरकर
- मुर्तिझापूर - हरीश मारोतीअप्पा पिंपळ
- तिवसा - राजेश श्रीरामजी वानखडे
- मेळघाट - केवलराम तुलसीराम काळे
- अचलपूर - प्रवीण वसंतराव तायडे
- मोर्शी - उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर
- देवळी - राजेश भाऊराव बकाणे
- हिंगणघाट - समीर त्र्यंबकराव कुणावर
- आमगाव - संजय पुरम
- चिमूर - बंटी भांगडिया
- उमरखेड - किसन मारोती वानखेडे
- नायगाव - राजेश संभाजीराव पवार
- हिंगोली - मुटकुळे तानाजी सखारामजी
- जिंतूर - बोर्डीकर मेघना दिपक साकोरे
- परतुर - बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर)
- बागलान - दिलीप मंगलू बोरसे
- नाशिक पूर्व - ॲड.राहुल उत्तमराव ढिकले
- नाशिक मध्य - देवयानी सुहास फरांदे
- नाशिक पश्चिम - हिरे सीमा महेश
- विक्रमगड - भोये हरिश्चंद्र सखाराम
- नालासोपारा - राजन बाळकृष्ण नाईक
- वसई - स्नेहा दुबे पंडित
- भिवंडी पश्चिम - चौघुले महेश प्रभाकर
- मुरबाड - किसन शंकर कथोरे
- उल्हासनगर - आयलानी कुमार उत्तमचंद
- कल्याण पूर्व - सुलभा गणपत गायकवाड
- डोंबिवली - चव्हाण रवींद्र दत्तात्रय
- मीरा भाईंदर - नरेंद्र मेहता
- बोरिवली - संजय उपाध्याय
- दहिसर - चौधरी मनीषा अशोक
- कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
- अंधेरी पश्चिम - अमित भास्कर साटम
- विलेपार्ले - आळवणी पराग
- घाटकोपर पूर्व - पराग शहा
- वडाळा - कालिदास निळकंठ कोळंबकर
- मलबार हिल - मंगल प्रभात लोढा
- कोलाबा - ॲड.राहुल सुरेश नरवेकर
- पेन - रविशेठ पाटील
- दौंड - कुल राहुल सुभाषराव
- चिंचवड - जगताप शंकर पांडुरंग
- शिवाजीनगर - सिद्धार्थ अनिल शिरोळे
- कोथरूड - चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील
- खडकवासला - भीमराव धोंडीबा तापकीर
- पुणे - कांबळे सुनील दयंदेव
- कसबा पेठ - हेमंत नारायण रासने
- शिर्डी - पाटील विखे राधाकृष्ण एकनाथराव
- आष्टी - धस सुरेश रामचंद्र
- केज - नमिता अक्षय मुंदडा
- माण - जयकुमार भगवानराव गोरे
- कराड उत्तर - मनोज भीमराव घोरपडे
- कराड दक्षिण - डॉ.अतुलबाबा सुरेश भोसले
- सातारा - शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोसले
- कणकवली - नितेश नारायण राणे
- कोल्हापूर दक्षिण - अमल महादेवराव महाडिक
- इचलकरंजी - राहुल प्रकाश आवाडे
- सांगली - सुधीरदादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ
- शिराळा - देशमुख सत्यजित शिवाजीराव