Monday, September 01, 2025 01:30:16 AM

वर्ध्यात घटस्फोटाच्या प्रकरणांची वाढ 12 महिन्यात 820 प्रकरणे...

वर्ध्यात 12 महिन्यात घटस्फोटासाठी 820 प्रकरणे चढली न्यायालयाची पायरी

वर्ध्यात घटस्फोटाच्या प्रकरणांची वाढ 12 महिन्यात 820 प्रकरणे

 प्रमोद पाणबुडे प्रतिनिधी वर्धा : प्रत्येक धर्मात विवाहाला पवित्र मानले गेले आहे. विवाह संस्कारामुळे गृहस्थाश्रम प्राप्त होतो, जो अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. गृहस्थाश्रम स्वीकारण्यासाठी विवाहाची पद्धत अत्यंत उत्कृष्ट आहे, असे सांगितले जाते. पण विवाहानंतर छोट्या छोट्या कारणांमुळे दाम्पत्यांमध्ये ताण निर्माण होतो आणि त्याचा परिणामी घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ होते. वर्ध्यात मागील 12 महिन्यांत घटस्फोटासाठी तब्बल 820 प्रकरणे न्यायालयात दाखल झाली आहेत. याच बारा महिन्यांच्या कालावधीत न्यायालयाने 732 घटस्फोटाचे प्रकरण निकाली काढले असून, घटस्फोट मंजूर करण्यात आले आहेत.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

विशेष म्हणजे घटस्फोटासाठी न्यायालयात प्रकरणे दाखल करणाऱ्यांमध्ये शिक्षित व्यक्तींची संख्या अधिक आहे. हे दाखवते की, आजकाल उच्चशिक्षित लोक देखील वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे घटस्फोट घेत आहेत.

घटस्फोटाची सामान्य कारणे काय?
 यामध्ये बांधिलकीचा अभाव, बेवफाई किंवा विवाहबाह्य संबंध, अत्यधिक भांडणे आणि वाद, तसेच शारीरिक जवळीक नसणे यांचा समावेश होतो. एक महत्त्वाचे कारण म्हणजे, सामायिक स्वारस्यांचा अभाव आणि भागीदारांमधील असंगतता हे घटस्फोटाच्या प्रमुख कारणांमध्ये मोडतात, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

घटस्फोटाच्या या वाढत्या प्रमाणामुळे समाजातील विवाह पद्धतीवर आणि त्याच्या संस्कृतीवर विचार करणे आवश्यक ठरते.

👉👉 हे देखील वाचा : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचा उत्साह: पहिल्या शाही स्नानासाठी प्रचंड गर्दी


सम्बन्धित सामग्री