Friday, September 05, 2025 07:33:33 AM

डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरीस यांच्यात चुरस

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरीस यांच्यात चुरस


मुंबई : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष त्या निवडणुकीकडे लागले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार तसेच विद्यमान उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार  माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील ही लढत अत्यंत अटीतटीची झाली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर अमेरिकी जनता शिक्कामोर्तब करणार आहे. २०२० मधील निवडणुकीनंतर जो बायडेन अध्यक्ष झाले. त्यावेळी ट्रम्प यांनी मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आणि न्यायालयात आव्हान दिले होते तसेच कॅपिटॉल हिल इमारतीबाहेर ट्रम्प समर्थकांनी दंगल घडविली होती. हा मुद्दा उपस्थित करून हॅरिस यांनी ट्रम्प यांच्याविरोधात टीकेची राळ उडवली आहे. मिशिगन येथे प्रचाराचा शेवट करताना त्यांनी सर्व अमेरिकी नागरिकांची मी अध्यक्ष असेन असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. 


अमेरिका निवडणुकीतील प्रचाराचे ठळक मुद्दे 

अमेरिकेलतील डेमोक्रेटिक पक्षाने समानता, बंधुता, मूलभूत स्वातंत्र्य, टनात्मक मूल्ये, महिलांचे हक्क आणि गाझा पट्टीतील संघर्षविराम या मुद्द्यांचा आधार घेत निवडणुकीचा प्रचार केला. तसेच अमेरिकेलतील 
रिपब्लिकन पक्षाने अमेरिकेची अर्थव्यवस्था, बेकायदा स्थलांतरित, बायडेन प्रशासनाची धोरणे, जगभरातील हिंदूंचे रक्षण या मुद्द्यांना समोर ठेवत प्रचार केला. 

या निवडणुकीत  अॅरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्वेनिया, विस्कॉन्सिन ही राज्ये निर्णायक ठरणार आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते कमला हॅरिस यांचे पारडे जड मानले जात आहे.


 


सम्बन्धित सामग्री