Wednesday, September 03, 2025 04:25:35 AM

Donald trump औषधांवर 200 टक्के Tariff लादण्याच्या तयारीत; अमेरिकन लोकच अडचणीत येणार?

याआधी, अनेक वर्षांपासून अमेरिकेने परदेशी औषधे कोणत्याही कराशिवाय आपल्या देशात येऊ दिली होती. मात्र, आता ट्रम्प यांच्या टॅरिफची वक्रदृष्टी औषधांवर पडू लागलेली आहे, असे दिसत आहे.

donald trump औषधांवर 200 टक्के tariff लादण्याच्या तयारीत अमेरिकन लोकच अडचणीत येणार

Donald Trump 200 Percent Tariff : ट्रम्प प्रशासन परदेशी औषधांवर 200 टक्के कर लादण्याची योजना आखत आहे. यामुळे औषधांच्या किमती वाढतील आणि पुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे अमेरिकन लोकांना महागड्या औषधांना सामोरे जावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्याच देशातील लोकांचे जीव घेण्याच्या तयारीत आहेत. इतर देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर मोठा कर लादल्यामुळे अमेरिकन लोकांना अनेक वस्तू महाग दरात खरेदी कराव्या लागत आहेत. याच्या दबावाखाली अमेरिकन लोकांची स्थिती कठीण झाली आहे. आता ट्रम्प यांच्या धोरणामुळे त्यांना स्वस्त औषधांपासूनही वंचित ठरहावे लागते की काय, अशी परिस्थिती झाली आहे.

ट्रम्प यांनी परदेशात बनवलेल्या औषधांवर मोठा कर लादण्याची योजना आखली आहे. हा कर 200 टक्के किंवा त्याहूनही जास्त असू शकतो. यामुळे भारत आणि इतर देशांना आर्थिक नुकसान होईल हे उघड आहे. परंतु, अमेरिकन लोकांची स्थिती काय असेल, असा विचार केला तर याचा अमेरिकन लोकांनाही नक्कीच त्रास होणार आहे, असे तज्ज्ञ म्हणत आहेत. कारण, जास्त कर लावल्यामुळे औषधे महाग होतील. शेवटी, अमेरिकन लोकांना या महागड्या औषधांचा खर्च सहन करावा लागेल.

हेही वाचा - AI Use Proved Fatal: ChatGPT वर आंधळा विश्वास ठरला घातक; सामान्य लक्षणांमागे निघाला प्राणघातक कर्करोग

याआधी, अनेक वर्षांपासून अमेरिकेने परदेशी औषधे कोणत्याही कराशिवाय आपल्या देशात येऊ दिली होती. परंतु अलीकडेच, युरोपसोबतच्या व्यापार करारात, अमेरिकेने युरोपमधून येणाऱ्या काही औषधे आणि इतर वस्तूंवर 15 टक्के कर लादला. या नवीन धोरणामुळे सामान्य लोकांसाठी औषधांच्या किमती महाग होऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या खिशावर भार वाढेल, हे उघड आहे.

ट्रम्प यांनी अमेरिकेत औषधे स्वस्त करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु इतका मोठा कर लादल्याने औषधांच्या किमती वाढू शकतात. यामुळे औषधांचा पुरवठा देखील रोखला जाऊ शकतो. कारण स्वस्त परदेशी औषधांची संख्या अमेरिकेत कमी होऊ शकते. याचा परिणाम असा होऊ शकतो की औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
वित्तीय सेवा कंपनी आयएनजीचे आरोग्य अर्थशास्त्रज्ञ डायडेरिक स्टॅडिग म्हणाले की, या प्रकारच्या करामुळे सामान्य लोकांना सर्वात जास्त नुकसान होईल. औषधांवर 25 टक्के कर लावला तरी, औषधांच्या किमती 10 ते 14 टक्क्यांनी वाढू शकतात. याचा परिणाम औषधांसाठी थेट पैसे देणाऱ्या लोकांवर म्हणजेच सामान्य ग्राहक किंवा उपभोक्ता यांच्यावर होईल. तसेच, आणखी एक परिणाम असा होईल की, विम्याचा खर्च देखील वाढेल.

स्वस्त औषधनिर्मिती करण्यासाठी दबाव
ट्रम्प यांनी अमेरिकेत औषधांच्या किमती कमी करण्यासाठी औषध कंपन्यांवर दबाव आणला आहे. त्यांनी अनेक कंपन्यांना पत्र लिहून अशी योजना बनवण्यास सांगितले आहे की, ज्यामध्ये अमेरिकेला सर्वात कमी किमतीत औषधे मिळतील. त्यांनी असेही म्हटले आहे की, ते एक किंवा दीड वर्षासाठी कर लादण्यास विलंब करू शकतात, जेणेकरून कंपन्या औषधे साठवू शकतील आणि त्यांचे कारखाने अमेरिकेत हलवू शकतील. परंतु, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर हा कर 2026 नंतर लागू झाला तर, त्याचा परिणाम 2027 किंवा 2028 पर्यंत दिसून येईल. कारण, कंपन्या आधीच औषधे साठवू शकतात. तेव्हा, यानंतरच्या औषधांच्या लॉटवर त्याचा परिणाम होईल.

अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, ट्रम्प 200 टक्क्यांपेक्षा कमी कर लादण्यास सहमती देऊ शकतात. अमेरिकेत बनवलेल्या औषधांवर कोणताही कर लागणार नाही, ज्यामुळे अनेक औषध कंपन्या आता अमेरिकेत गुंतवणूक करत आहेत. परंतु, अमेरिकेत औषध कारखाना बांधणे केवळ महागच नाही तर त्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. याशिवाय, जर औषधांच्या कच्च्या मालावरही कर लावला गेला तर, कंपन्यांना कर पूर्णपणे टाळणे कठीण होईल. यामुळे औषधांच्या किमती आणखी वाढू शकतात, ज्याचा परिणाम सामान्य लोकांवर होईल. त्यामुळे औषधांवर कर लादणे हे अमेरिकन लोकांसाठीच जास्त त्रासदायक ठरेल.

हेही वाचा - India-US Relations: 'पाकिस्तानशी व्यवसाय करण्यासाठी भारताशी संबंध तोडले'; अमेरिकेच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा ट्रम्पवर आरोप

भारतीय वस्तूंवर आतापर्यंत किती कर आहे?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के कर लादला आहे. तो दोन टप्प्यात लागू करण्यात आला. पहिला 25 टक्के कर 1 ऑगस्ट 2025 पासून लागू झाला आणि दुसरा 25 टक्के कर 27 ऑगस्ट 2025 पासून लागू झाला. भारताने रशियन तेल खरेदी केल्यामुळे अतिरिक्त 25 टक्के कर लादण्यात आला. याचा परिणाम कापड, रत्ने आणि दागिने, चामडे, सागरी उत्पादने, रसायने आणि ऑटो पार्ट्स यासारख्या क्षेत्रांवर झाला आहे. औषधे, सेमीकंडक्टर आणि ऊर्जा संसाधनांवर अद्याप 50 टक्के कर नाही.


सम्बन्धित सामग्री