मुंबई : 'त्यांना फोटो काढायला घरी पाठवू' या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांना टोला हाणला. ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. सत्तेत असताना विकासाकरिता तसेच समाजातील सर्व वर्गांच्या कल्याणासाठी केलेल्या कामामुळे महायुतीच पुन्हा सत्तेत येईल; असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
सत्तेत आल्यावर सुरू असलेल्या विकासकामांना आणखी चालना दिली जाईल. विकासकामांचा वेग वाढवू; असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. समृद्धी महामार्गाद्वारे राज्यात, प्रामुख्याने विदर्भात समृद्धी येऊ लागली आहे. सत्तेत आल्यावर रोजगार निर्मितीवर आणखी भर देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुलाखतीतले महत्त्वाचे मुद्दे
'सीएम म्हणजे कॉमन मॅन'
'मविआने सर्व प्रोजेक्ट बंद पाडले'
'महायुतीचं सरकार आणू'
'शासन आपल्या दारी या योजनेमुळे जनतेला फायदा'
'त्यांनी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले'
'कार्यकर्त्याला घरगडी नाही सवंगडी समजायचं असतं'
'महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आणत आहोत'
'समृद्धी महामार्गामुळे विदर्भात उद्योग येत आहेत'
'त्यांना सत्तेत असताना अदानी हवे होते'
'घरात बसून काम करणाऱ्यांना जनता घरी बसवेल'
'मुंबई खड्डेमुक्ते, प्रदूषणमुक्त होणार'
'त्यांना फोटो काढायला घरी पाठवू'
'त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले'
'त्यांनी आमदारांचे खच्चीकरण केले'
'उद्धव ठाकरे संधीसाधू'