Wednesday, August 20, 2025 12:45:47 PM

एकनाथ शिंदेच ठरलं!

'एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम' 'जय महाराष्ट्र'ला सूत्रांची माहिती

एकनाथ शिंदेच ठरलं

मुंबई: विधानसभेनंतर शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत हे तर निश्चित.  परंतु आता सर्वांचे लक्ष लागून ते उपमुख्यमंत्रीपदाकडे. दिनांक ४ डिसेंबरच्या पत्रकार परिषदे दरम्यान एकनाथ शिंदे यांना एक प्रश्न विचारण्यात आला की मुख्यमंत्र्यांसह तुम्हीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का ? या प्रश्नाचे उत्तर देत शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केलंय...संध्याकाळपर्यंत थांबा तुम्हाला सगळं कळेल. हे बोलणं झाल्यावर अजित पवार म्हणाले संध्याकाळपर्यंत त्यांचा समन्वय येईल, पर मैं तो रुकनेवाला नहीं, मी तर शपथ घेणारच आहे.. अजित पवारांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, दादांना अनुभव आहे..सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा... त्यानंतर या विधानांमुळे पत्रकार परिषदेमध्ये काही क्षणासाठी सगळे खळखळून हसले. 

यानंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे तर नक्की झालं पण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? हा प्रश्न सर्वानाच पडला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोबतच काही मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी देखील घ्यावा अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केली असल्याची माहिती आहे.

त्याचबरोबर एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम असल्याची माहिती देखील 'जय महाराष्ट्र' च्या सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात दीड तास चर्चा झाल्यानंतर हि माहिती समोर आली आहे. दरम्यान आता या शपथविधीची जोरदार तयारी सुरु असून एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदाची शपथ घेणार का याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे. 


सम्बन्धित सामग्री