Wednesday, August 20, 2025 08:45:48 PM

एकनाथ शिंदे घेणार महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा

शिंदे यांच्या नेतृत्वात विविध बैठका पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे घेणार महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा

मुंबई: विधानसभा निवडणूक पार पडल्या. दिनांक 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर शपथविधी पार पडणार असून शपथविधीची जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे हे महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने महायुतीतील चर्चा थांबली होती. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे आजपासून सक्रिय होणार असून शिंदे यांच्या नेतृत्वात विविध बैठका पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

दिनांक 6 डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे सकाळी बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते पक्षातील विविध नेत्यांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे आजारी असल्याने त्यांनी भेटी गाठी टाळल्या होत्या. परंतु आता एकनाथ शिंदे हे आजपासून सक्रिय होणार असून महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत. वर्षा बंगल्यावर शिंदे ही बैठक घेणार असून दोन्ही उपमुख्यमंत्रीही या बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. दुपारी 2 वाजता काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. 

बैठकीत काय होणार चर्चा? 
मंत्रि‍पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदे भेटतील. त्याच बरोबर सत्तेत आपला वाटा कसा असावा, याबाबत ते शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे देखील समजते आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेणार असून वर्षा बंगल्यावर शिंदे बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्रीही हजर राहणार आहेत. दुपारी 2 वाजता काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची ही बैठक आहेत. दरम्यान या बैठकीत आणखी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


सम्बन्धित सामग्री