Monday, September 01, 2025 02:35:21 PM

EPFO चा नवा निर्णय, पेन्शन आणि PF काढणे होणार आणखी सोपे

EPFO ने आपल्या सभासदांसाठी सेवा सुधारण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यात एकूण 8.78 कोटी लोकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

epfo चा नवा निर्णय पेन्शन आणि pf काढणे होणार आणखी सोपे
EPFO चा नवा निर्णय, पेन्शन आणि PF काढणे होणार आणखी सोपे

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) आपल्या सभासदांसाठी सेवा सुधारण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यात त्यांनी 15 नवीन बँकांसोबत करार केला आहे. यापूर्वी केवळ 17 बँकांमधून EPFO च्या सेवा मिळत होत्या. पण आता हा आकडा 32 वर पोहोचला आहे. या निर्णयाचा थेट फायदा कोट्यवधी EPFO सदस्यांना होणार आहे.

सध्या 8 कोटीहून अधिक कर्मचारी EPFO चे सदस्य आहेत आणि 78 लाखांहून अधिक निवृत्ती वेतनधारक (पेंशनर्स) आहेत. यामुळे एकूण 8.78 कोटी लोकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. आधी पेंशनधारकांना काही निवडक बँकांमध्येच खाते उघडावे लागत होते. पण आता ही बंधने हटवण्यात आली आहेत. त्यामुळे कोणीही कोणत्याही बँकेच्या माध्यमातून आपल्या PF आणि पेंशन सेवांचा लाभ घेऊ शकणार आहेत.

 

हेही वाचा - 'आम्ही त्यांच्यासारख्या समित्या बनवत नाही...'; वक्फ विधेयकावरून अमित शहा यांची काँग्रेसवर टीका 

 

UPI आणि एटीएमद्वारे PF काढण्याची सुविधा

EPFO लवकरच आणखी एक मोठा बदल करणार आहे. 2025 च्या मे-जूनपर्यंत कर्मचारी थेट UPI आणि ATM च्या माध्यमातून PF रक्कम काढू शकणार आहेत. सध्या PF काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम करावा लागतो. ज्याला अनेक दिवस किंवा आठवडे लागू शकतात. पण नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर कर्मचारी UPI अॅपवर थेट PF बॅलन्स पाहू शकतील आणि त्वरित आपल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत.

 

हेही वाचा -  Waqf Amendment Bill: संसदेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू; सभापतींनी विरोधकांना बोलण्यासाठी दिला 'इतका' वेळ

 

UPI वरून 1 लाख रुपयांपर्यंत PF काढण्याची योजना

श्रम मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी सांगितलं की, EPFO लवकरच UPI द्वारे 1 लाख रुपयांपर्यंतची PF रक्कम त्वरित काढण्याची सुविधा देणार आहे. या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांना कोणत्याही विलंबाशिवाय त्यांचे पैसे मिळू शकतील.

 

डिजिटल भारतासाठी महत्त्वाचे पाऊल

EPFO च्या या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँकांची संख्या वाढल्याने निवड करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तर UPI आणि ATM सुविधा सुरू झाल्यानंतर पैशांची त्वरित विड्रॉल शक्य होणार आहे. हा निर्णय डिजिटल भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल असून भविष्यात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री