Sunday, August 31, 2025 05:24:16 PM

मुंबईत मेट्रो स्थानकाला आग

वांद्रे कुर्ला संकुल या भूमिगत मेट्रो स्थानकाच्या तीन अ (3A) या प्रवेशद्वाराला आग लागली.

मुंबईत मेट्रो स्थानकाला आग

मुंबई : वांद्रे कुर्ला संकुल या भूमिगत मेट्रो स्थानकाच्या तीन अ (3A) या प्रवेशद्वाराला आग लागली. आग लागताच तातडीने स्थानकावरील सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. आग विझवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. ज्या भागाला आग लागली तिथे बांधकाम सुरू होते. हे काम सुरू असताना आग लागली. आग लागण्याचे नेमके कारण समजलेले नाही. पण या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.


सम्बन्धित सामग्री