Wednesday, August 20, 2025 05:50:17 PM

Kedar Jadhav Joins BJP: माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश

केदार जाधव यांनी मुंबईत कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

kedar jadhav joins bjp माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश
Kedar Jadhav Joins BJP
Edited Image, X

Kedar Jadhav Joins BJP: माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटनंतर राजकारणात आपली इनिंग सुरू करणार आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात केदार जाधव यांनी मुंबईत कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर केदार जाधव यांनी सांगितले की, '2014 मध्ये केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून त्यांना मिळालेले प्रेम आणि पाठिंबा आणि पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ती मला खूप प्रेरणादायी वाटते. माझे ध्येय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपसाठी काहीतरी छोटे योगदान देणे आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, मला जी काही जबाबदारी मिळेल ती मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन.

हेही वाचा - मुंबई विद्यापीठाचा बेजबाबदार कारभार उघड; परीक्षा सुरू असतानाच बदलली प्रश्नपत्रिका

गेल्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा -  

केदार जाधवने गेल्या वर्षी जूनमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली होती. 39 वर्षीय खेळाडूने भारतासाठी शेवटचा सामना 8 फेब्रुवारी 2020 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला. चार सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने फक्त 35 धावा केल्या. या मालिकेत, त्याला फक्त दोन सामन्यांमध्ये प्लेइंग 11 चा भाग बनवण्यात आले.

2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण - 

हेही वाचा - शाहांचा आरोप;वक्फने कंकालेश्वर मंदिराची जागा हडपली

केदार जाधवने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 16 नोव्हेंबर 2014 रोजी रांची येथे श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये जाधवने 1389 धावा केल्या. या काळात त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतके झळकावली. 
 


सम्बन्धित सामग्री