सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता दिसून येत आहे. मुंबईमध्ये सर्व मोठ्या गणरायांचे मोठ्या जाल्लोशात स्वागत करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी चिंचपोकळीच्याआ चिंतामणीचे मोठ्या ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले आहे. अशातच आता नवसाचा मानला जाणारा गणपती म्हणजे लालबागच्यआ राजाची पहिली झलक समोर आली आहे.
राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. आता या वर्षाच्या राजाची पहिली झलक भक्तांना पाहायला मिळाली. मुंबईतील लालबागच्या राजाच्या ओळख नवसाला पावणारा गणपती अशी आहे. यामुळेच मुंबई आणि मुंबईच्या बाहेरुन देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात.
यावर्षी 27ऑगस्ट रोजी गणपती विराजमान होणार आहेत. दरम्यान आता सर्वांच्या घरी गणपतीच्या आगमनाची तयारी मोठ्या उत्साहाने केली जात आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे.