Thursday, August 21, 2025 07:59:54 AM

'गद्दार' गाणाऱ्या कुणाल कामराला जागतिक पाठिंबा – दोन दिवसांत 4 कोटींची मदत!

लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क असतानाही, कुणालला कायदेशीर कारवाईची भीती दाखवली जात आहे.

गद्दार गाणाऱ्या कुणाल कामराला जागतिक पाठिंबा – दोन दिवसांत 4 कोटींची मदत

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने गायलेल्या ‘गद्दार’ गीतामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर ताशेरे ओढणाऱ्या या गाण्यामुळे कुणालवर कायदेशीर कारवाईचा दबाव टाकला जात असला, तरी त्याला देशविदेशातून भरघोस पाठिंबा मिळत आहे.

लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क असतानाही, कुणालला कायदेशीर कारवाईची भीती दाखवली जात आहे. मात्र, या विरोधात त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर एकजूट दाखवत त्याच्या कायदेशीर लढ्यासाठी मदतीचा वर्षाव केला आहे. गेल्या दोन दिवसांत कुणालच्या खात्यात तब्बल 4 कोटी 7 लाख 80 हजार रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.

कुणालच्या गाण्याने केवळ महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण देशात राजकीय चर्चेला वेग आला आहे. पोलिसांनी त्याला दोन समन्स बजावले असले, तरी कुणाल अधिक ठामपणे आपल्या भूमिकेवर उभा आहे. त्याच्या समर्थनार्थ अनेक नामवंत कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनीही आवाज उठवला आहे.
 


सम्बन्धित सामग्री