Gold Price Today: मंगळवारी सोनं आणि चांदीच्या किमतीत घट झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 111,050 झाली आहे. म्हणजेचं सोन्याच्या दरात मागील दरापेक्षा 10 नी घसरण झाली. चांदीची किंमतही 100 रुपयांनी कमी होऊन 1 किलोग्रॅमसाठी 132,900 रुपये इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट सोन्याची किंमत 10 रुपयांनी कमी होऊन 10 ग्रॅमसाठी 101,790 झाली आहे.
शहरानुसार सोन्याचे दर:
मुंबई आणि कोलकाता: 24 कॅरेट, 10 ग्रॅम – 111,050
चेन्नई: 24 कॅरेट, 10 ग्रॅम – 111,370
दिल्ली: 24 कॅरेट, 10 ग्रॅम – 111,200
मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद: 22 कॅरेट, 10 ग्रॅम – 101,790
चेन्नई: 22 कॅरेट, 10 ग्रॅम – 102,090
दिल्ली: 22 कॅरेट, 10 ग्रॅम – 101,940
चांदीच्या किंमती:
दिल्ली, कोलकाता, मुंबई: 1 ग्रॅम – 132,900
चेन्नई: 1 ग्रॅम – 142,900
हेही वाचा - State Debt Burden : महायुती सरकारसमोर आर्थिक संकट; राज्यावर 8.55 लाख कोटींचा कर्जबोजा, वर्षाअखेरपर्यंत वाढू शकतं कर्ज
आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या, पण मंगळवारी डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरण बैठकीपूर्वी कर्ज दरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सत्राच्या सुरुवातीला, अमेरिकन सोन्याचा स्पॉट भाव 3,689.27 डॉलर प्रति औंस होता आणि 0109 GMT पर्यंत 3,680.17 डॉलर प्रति औंस वर स्थिर राहिला. डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा 3,718.80 डॉलर होता.
इतर धातूंच्या किंमती:
स्पॉट सिल्व्हर: 42.71 डॉलर प्रति औंस
प्लॅटिनम: 1,399.40 डॉलर (0.1% घसरण)
पॅलेडियम: 1,188.59 डॉलर (0.4% वाढ)
दरम्यान, सोन्याचे व्यापार संघटन इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) आणि Aspect Global Ventures चे समूह प्रमुख मोहित कंबोज यांनी सांगितलं की, सध्या चांदीत वाढ होण्याची क्षमता जास्त आहे, परंतु ही वाढ जागतिक व्यापार, व्याजदर आणि व्यावसायिक चक्रांवर अवलंबून आहे. मोहित कंबोज यांनी सांगितलं की, भारतीय बाजारात सध्या सोन्याचा दर 109,511 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्यात अजूनही चढती कमान सुरू आहे, याचेच हे दर द्योतक आहेत. गुंतवणूकदार आता सोने केवळ दागिन्यांसाठी नाही तर सुरक्षित गुंतवणूक (Safe-Haven Asset) म्हणून पाहत आहेत.
जागतिक पातळीवरील महागाई, जगातील प्रमुख देशांमध्ये व्याजदर कपातीची अपेक्षा आणि विशेषतः US Fed कडून आलेला सौम्य (Dovish) संकेत यामुळे डॉलर कमकुवत झाला आहे, आणि त्याचा थेट फायदा सोन्याला मिळत आहे. रुपया घसरल्यामुळे आयात खर्च वाढतो आणि त्यामुळे देशांतर्गत (स्थानिक) दर झपाट्याने वर जातात. व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहता, सोने हे Risk Hedge म्हणून मजबूत आहे. पण दर जेव्हा 110,000 रुपयांच्या वर जातील, विशेषतः सणासुदी आणि विवाहसोहळ्यांच्या कालावधीत गुंतवणूकदार नफावसुली करण्याची शक्यता आहे. एकंदरीत, तुमच्या पोर्टफोलिओला स्थिरता द्यायची असेल किंवा गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय हवा असेल तर सोने आकर्षक आहे. फक्त योग्य वेळ आणि रणनीती महत्त्वाची आहे, असंही मोहित कंबोज यांनी नमूद केलं आहे.
हेही वाचा - UPI Transaction Limit: डिजिटल व्यवहार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आता UPI द्वारे दररोज 10 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार
तथापी, सध्या चांदीचा दर 127,791 रुपये प्रति किलो आहे. चांदीला Safe-Haven Demand बरोबरच इलेक्ट्रॉनिक्स, सोलार आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातून भक्कम आधार मिळत आहे. सोन्याची मागणी प्रामुख्याने जागतिक अनिश्चिततेवर अवलंबून असते, तर चांदीला औद्योगिक वापरातूनही मागणी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा साखळीतील बंधने व मर्यादा यामुळे बाजारपेठ तंग आहे. तसेच भारतात आयातशुल्क, वाहतूक व रुपयाच्या घसरणीमुळे दर आणखी वाढले आहेत. गुंतवणूकदारांसाठी चांदी म्हणजे सोन्याला पूरक पर्याय, तसेच औद्योगिक मागणीशी जोडलेले गुंतवणूक साधन आहे. मात्र, चांदीचे दर सोन्यापेक्षा जास्त चढ-उतार दाखवू शकतात, त्यामुळे अल्पकालीन कच्चामाल खर्चावर (Raw Material Cost) लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे, असंही मोहित कंबोज यांनी स्पष्ट केलं आहे.