Betting App Case: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कारवाई केली आहे. 1xBet या बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणातील चौकशीसाठी सोनू सूदला ईडीने समन्स बजावले असून, त्याला 24 सप्टेंबर रोजी दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने आणि सखोल पद्धतीने सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या चौकशीत उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांची नावेही समोर आली आहेत. ईडीकडून या सर्वांची वेगवेगळी विचारपूस सुरू असून, सेलिब्रिटी आणि माजी खेळाडूंनी बेटिंग साइट्ससाठी केलेल्या जाहिरात मोहिमा आणि प्रचारात्मक करारांची तपासणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - Farah Khan on Baba Ramdev : फराह खानने केली रामदेव बाबांची सलमान खानशी तुलना, म्हणाली, 'स्वत: झोपडीमध्ये राहतो आणि...'
एनडीटीव्ही प्रॉफिटला दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'हे बेटिंग प्लॅटफॉर्म अनेकदा 1xbat, 1xbat sporting lines सारखी छद्म नावे वापरतात. जाहिरातींमध्ये QR कोडचा वापर करून थेट बेकायदेशीर बेटिंग साइट्सवर लोकांना नेले जाते, जे भारतीय कायद्याचे उल्लंघन आहे.'
हेही वाचा - Raj Thackeray On Dashavatar Movie : राज ठाकरेंनी केलं दशावतार चित्रपटाचं कौतुक; म्हणाले, 'जमिनी वाचवा, कारण तुमचं अस्तित्व...'
अभिनय कारकिर्दीबाबत बोलायचे झाले तर, 52 वर्षीय सोनू सूद नुकताच ‘माधा गज राजा’ या अॅक्शन कॉमेडी चित्रपटात झळकला होता. याआधी तो जॅकलिन फर्नांडिससोबत त्याच्या दिग्दर्शक पदार्पणाच्या चित्रपट ‘फतेह’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात विजय राज आणि दिव्येंदु भट्टाचार्य यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट जिओहॉटस्टारवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. सध्या मात्र सोनू सूद चित्रपटांपेक्षा सामाजिक कार्यात व्यस्त आहे. त्याने काही दिवसांपूर्वी पंजाबमधील पुरग्रस्तांना मदत केली होती.