Thursday, September 04, 2025 01:06:16 AM

आशा सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ करणार

भाजपाच्या जाहीरनाम्यातून आशा सेविकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे

आशा सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ करणार


मुंबई : नुकताच भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्याचे नाव संकल्प पत्र आहे. या जाहीरनाम्यात आशा सेविकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाकडून आशा सेविकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

आशा सेविकांना काम करूनही हवे तसे वेतन मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्याकडून आंदोलने, निषेध, मोर्चा काढण्यात येत असल्याचे पाहायला मिळते. परंतु भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यातून अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या  मानधनात वाढ करून त्यांना दर महिना १५ हजार वेतन दिले जाणार आहे. त्याचबरोबर त्यांना विमा संरक्षण देणार असल्याचे भाजपाच्या संकल्प पत्रातून जाहीर करण्यात आले. 

 


सम्बन्धित सामग्री