Sunday, August 31, 2025 01:50:08 PM

राज्यातले वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे ?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 66.05 टक्के मतदान झाले. दुपारी तीन ते संध्याकाळी सहा या वेळेत राज्यात अनेक ठिकाणी मतदानासाठी गर्दी वाढली होती. या वाढलेल्या गर्दीमुळे मतदानाची टक्केवारी वाढली.

राज्यातले वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 66.05 टक्के मतदान झाले. दुपारी तीन ते संध्याकाळी सहा या वेळेत राज्यात अनेक ठिकाणी मतदानासाठी गर्दी वाढली होती. या वाढलेल्या गर्दीमुळे मतदानाची टक्केवारी अंतिम टप्प्यात वाढली. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. राज्यातले वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे ठरणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे. 

राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात

राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात आणि सर्वात कमी मतदान मुंबई शहर जिल्ह्यात झाले. कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान झाले तर मुंबई शहर जिल्ह्यात 52.65 टक्के मतदान झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गडचिरोली जिल्हा मतदानात आघाडीवर होता. पण अंतिम टप्प्यात कोल्हापूरकरांनी मतदानाचा हक्क बजावण्यात आघाडी घेतली. गडचिरोली जिल्ह्यात 75.26 टक्के मतदान झाले.

निवडणुकीतील वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर

निवडणुकीसाठी प्रचार करत असताना अनेक नेत्यांनी दिलेल्या घोषणांवरुन वाद झाले. या वादाला कारण ठरलेल्या घोषणांबाबत निवडणूक आयोगाने अहवाल तयार केला आहे. राज्यातील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला हा अहवाल दिल्लीत आयोगाच्या मुख्यालयात पाठवण्यात आला आहे. अहवालाचा अभ्यास करुन निवडणूक आयुक्त वादाचे कारण ठरलेल्या घोषणांप्रकरणी कोणावर काय कारवाई करावी याबाबतचे निर्णय घेणार आहेत. 

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी

  1. अहमदनगर जिल्हा - 72.47 टक्के
  2. अकोला जिल्हा - 64.76 टक्के
  3. अमरावती जिल्हा - 66.40 टक्के
  4. औरंगाबाद जिल्हा - 69.64 टक्के
  5. बीड जिल्हा - 68.88 टक्के
  6. भंडारा जिल्हा - 70.87 टक्के
  7. बुलढाणा जिल्हा - 70.60 टक्के
  8. चंद्रपूर जिल्हा - 71.33 टक्के
  9. धुळे जिल्हा - 65.47 टक्के
  10. गडचिरोली जिल्हा - 75.26 टक्के
  11. गोंदिया जिल्हा - 69.74 टक्के
  12. हिंगोली जिल्हा - 72.24 टक्के
  13. जळगाव जिल्हा - 65.80 टक्के
  14. जालना जिल्हा - 72.67 टक्के
  15. कोल्हापूर जिल्हा - 76.63 टक्के
  16. लातूर जिल्हा - 67.03 टक्के
  17. मुंबई शहर जिल्हा - 52.65 टक्के
  18. मुंबई उपनगर जिल्हा - 56.39 टक्के
  19. नागपूर जिल्हा - 61.60 टक्के
  20. नांदेड जिल्हा - 69.45 टक्के
  21. नंदुरबार जिल्हा - 71.88 टक्के
  22. नाशिक जिल्हा - 69.12 टक्के
  23. उस्मानाबाद जिल्हा - 65.62 टक्के
  24. पालघर जिल्हा - 66.63 टक्के
  25. परभणी जिल्हा - 71.45 टक्के
  26. पुणे जिल्हा - 61.62 टक्के
  27. रायगड जिल्हा - 69.15 टक्के
  28. रत्नागिरी जिल्हा - 65.23 टक्के
  29. सांगली जिल्हा - 72.12 टक्के
  30. सातारा जिल्हा - 71.95 टक्के
  31. सिंधुदुर्ग जिल्हा - 71.14 टक्के
  32. सोलापूर जिल्हा - 67.72 टक्के
  33. ठाणे जिल्हा - 56.93 टक्के
  34. वर्धा जिल्हा - 69.29 टक्के
  35. वाशिम जिल्हा - 67.09 टक्के
  36. यवतमाळ जिल्हा - 70.86 टक्के

सम्बन्धित सामग्री